फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे, यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांनी काही फाॅरमॅटमधून निवृतीची घोषणा केली आहे, तर पुजारा, अमित मिश्रा या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आता न्यूझीलंडचा माजी खेळाडू राॅस टेलरने त्याची निवृती मागे घेतली आहे आणि त्याच्या या निर्णयाने सर्वानाच धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा माजी स्टार फलंदाज रॉस टेलरने तीन वर्षांनंतर निवृत्तीतून परतण्याची घोषणा केली आहे.
त्याने निवृतीतून मागे परतल्यानंतर आता तो यावेळी त्याच्या आईच्या देशाकडून खेळेल. ४१ वर्षीय टेलर पुढील महिन्यात ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत सहभागी होणार आहे. यावेळी तो किवी संघाकडून खेळताना दिसणार नाही, तर त्याच्या आईच्या देश सामोआकडून खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० शतके झळकावणाऱ्या टेलरच्या या हालचालीने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
४१ वर्षीय टेलरने सोशल मीडियावर सामोआच्या जर्सीसह एक फोटो शेअर करून ही माहिती दिली. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये निवृत्तीनंतर बाहेर येत आहे, हे अधिकृत आहे – मी निळ्या रंगात खेळणार आहे आणि क्रिकेटमध्ये सामोआचे प्रतिनिधित्व करणार आहे हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो. हे फक्त माझ्या आवडत्या खेळात परतणे नाही – माझ्या वारशाचे, संस्कृतीचे, गावांचे आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करण्याचा हा एक मोठा सन्मान आहे.
खेळाला परत देण्याची, संघात सामील होण्याची आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर माझा अनुभव शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी उत्सुक आहे. परत बाहेर पडण्याची वेळ – जगासाठी #६८५!
स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये, तो पुढील महिन्यात ओमानमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत सामोआकडून खेळेल. त्याने त्याच्या कारकिर्दिमध्ये कमालीची कामगिरी केली आहे
४१ वर्षीय रॉस टेलर हा न्यूझीलंडचा सर्वाधिक खेळणारा खेळाडू आहे. त्याने २००६ मध्ये न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ११२ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या टेलरने १८१९९ धावा केल्या आहेत. २०२२ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी, टेलरने ११२ कसोटी सामन्यांच्या १९६ डावांमध्ये ४४.६६ च्या सरासरीने ७६८३ धावा केल्या, ज्यामध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतके समाविष्ट आहेत.
त्याच वेळी, २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४७.५५ च्या सरासरीने ८६०७ धावा केल्या आणि २१ शतके आणि ५१ अर्धशतके केली. टी-२० मध्ये त्याच्या नावावर ७ अर्धशतकांसह १९०९ धावा आहेत. रॉस टेलरने २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता, जरी आता तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतत आहे.