Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…

आंदेकर-गायकवाड टोळी युद्धाचा बळी आंदेकर यांचा नातू ठरला गेला आहे. गणेश कोमकर याला बंडू आंदेकर यांची लहान मुलगी आहे. गणेशला दोन मुले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2025 | 09:30 PM
Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…
Follow Us
Close
Follow Us:

पुण्यात घडले गॅंगवॉर 
नाना पेठेत तरुणाची हत्या 
पुणे पोलिसांकडून तपास सुरू

पुणे/अक्षय फाटक: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाला वर्षपुर्ण होते नव्हे तोवर कुख्यात आंदेकर टोळीने रचलेला बदल्याचा ‘डाव’ अखेर यशस्वी ठरत बंडू आंदेकरचा जावई तसेच वनराजच्या खूनातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाचा राहत्या घराच्या दारात गोळ्या झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जन मिरवणूकीच्या गर्देत हा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुण्याच्या नाना पेठ व आसपासच्या परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद  (वय २२) याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. तर, एकजन जखमी झाला आहे. ही घटना नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्पलेक्सच्या गेटवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. दरम्यान, गोळ्या झाडून आंदेकर टोळीतील आरोपी पसार झाल्याची माहिती आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्याच्या मध्यभागात रात्री साडे नऊच्या सुमारास सोमनाथ गायकवाड तसेच बंडू आंदेकर यांची मोठी मुलगी संजीवनी तसेच तिचा पती जंयत कोमकर, त्याचे भाऊ प्रकाश व गणेश कोमकर यांनी कटरचून गोळ्या झाडत व कोयत्याने सपासप वारकरून खून केल्याची घटना घडली होती. यानंतर पुण्यातील हे खून सत्र पुढेही सुरूच राहिल असे भाकित वर्तवले जात होते. रिप्लाय म्हणून आंदेकर टोळीकडून कोणाचा तरी गेम केला जाईल असे सांगितले जात होते. वर्षानंतर आंदेकर टोळीने खूनाचा बदला म्हणून पहिली गेम ही कोमकर कुटूंबियातील गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद याचा गोळ्या झाडून खून केला.

कोमकर कुटूंबिय नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्पलेक्स या इमारतीत राहण्यास आहे. शुक्रवारी आठच्या सुमारास गोविंद हा त्याच्या एका मित्रासोबत इमारतीच्या खाली थांबलेला होता. तेव्हा दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी थेट गोविंदवर गोळ्या झाडत त्याचा खून केला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. दरम्यान, भर वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडला गेल्याने मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली.

आंदेकरांच्या खुनाचा बदला थांबला, पोलिसांनी टोळीचा गेमच उधळला; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

टोळी युद्धातून नातवाचा जीव घेतला

आंदेकर-गायकवाड टोळी युद्धाचा बळी आंदेकर यांचा नातू ठरला गेला आहे. गणेश कोमकर याला बंडू आंदेकर यांची लहान मुलगी आहे. गणेशला दोन मुले आहेत. त्याचा मोठा मुलगा हा गोविंद होता. आंदेकर गँगकडून त्यालाच टार्गेट करण्यात आले आणि त्याचा जीव घेतला गेला.

ऐन विसर्जन मिरवणूकीच्या पुर्वसंध्येला खून

वैभवशाली गणेशोत्सावाच्या विसर्जन मिरवणूकीच्या पुर्वसंध्येला पुण्यात टोळी युद्धातून गोळ्या झाडून खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याच्या मध्यभागात यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त असताना हा खून झाला. तर दुसरीकडे तीन दिवसांपुर्वीच आंदेकर टोळीच्या कटाचा सुगावा लागल्याने शस्त्र पुरवणाऱ्या तसेच वॉच ठेवणाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतरही आंदेकर टोळीकडून गेम सक्सेस केला असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ लागेल आहेत.

चौकट

टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया, दो ये मटका हे गाणे डीजेवर लावत नाना पेठेत गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद  (वय २२) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Gang war in pune 3 bullets fire and murder at ganesh komkar vanraj aandekar case crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • crime news
  • Murder News
  • Pune Crime
  • Pune Police
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
1

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Crime News: आंबा घाट परिसरात मानवी हाडे अन्…;  राकेश खून प्रकरणात मोठा उलगडा
2

Crime News: आंबा घाट परिसरात मानवी हाडे अन्…; राकेश खून प्रकरणात मोठा उलगडा

एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली ‘हे’ आवाहन
3

एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली ‘हे’ आवाहन

“… असं सरकारला वाटत नाही?” लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 
4

“… असं सरकारला वाटत नाही?” लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.