Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Damini Pathak : पुणे शहर पोलिसांचे दामिनी पथक ठरतंय महिलांचं ‘लाइफगार्ड’! दोन आत्महत्या रोखून वाचवले प्राण

पुणे शहर पोलिसांचे दामिनी पथक हे महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दोन महिला पोलिसांनी दोन महिलांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 31, 2025 | 02:45 PM
Pune Police Damini Squad dissuades two women from committing suicide police news

Pune Police Damini Squad dissuades two women from committing suicide police news

Follow Us
Close
Follow Us:

Pune Damini Pathak : पुणे : शहर पोलिसांच्या दामिनी पथक हे फक्त महिलांच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर संकटसमयी जीवनरक्षक कवच ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोथरूड पोलिसांच्या दामिन मार्शलने आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या दोन उच्च शिक्षित महिलांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दामिनी पथकातील पोलीस शिपाई श्रुती कढणे आणि आरती जाधव असे या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कोथरूड पोलिस ठाण्याअंतर्गत त्या दामिनी मार्शलवर कर्तव्यावर आहेत. श्रुती कढणे या राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेत्या बॉक्सिंग खेळाडू आहेत. त्या स्व:अनुभवाचा उपयोग करून शाळा-कॉलेजमधील मुलींना सेल्फ डिफेन्सचे मार्गदर्शन करतात. सतत महिलांशी, विद्यार्थिनींशी व जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत जनजागृती करण्याचे काम श्रुती कढणे करतात.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोथरूडमधील करिष्मा सोसायटीत २६ वर्षीय तरुणीने नैराश्यातून औषधांचे सेवन केले होते. ही माहिती दामिनी पथकाला मिळाली. लागलीच श्रुती कढणे व आरती जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला रुग्णालयात घेऊन जात वेळेत उपचार मिळवून दिले. नंतर तिला धीर देत तिची समजूत घातली. तसेच आत्महत्येच्या मार्गावरून परावृत्त केले. घटस्फोटाच्या मानसिक तणावातून तिने हे पाऊल उचलले होते. दुसऱ्याच दिवशी आणखी एक घटना अशीच घडली. तेथे दामिनी पथकाने धाव घेत या तरुणीला धीर दिला. मयूर कॉलनीत महिला कौटुंबिक कारणातून आई-वडिलांसोबत राहते. तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या तयारीत होती. या वेळीही दामिनी पथकाने तिथे धाव घेत तिचे मन परावृत्त करून प्राण वाचविले. तिला “प्रत्येक अडचणीला मार्ग असतो, स्वतःचा जीव घेणे चूक आहे” असे समजावत सुरक्षितपणे आई-वडिलांकडे सुपूर्द केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही कामगिरी केली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दामिनी पथकाचे विविध समोजपयोगी उपक्रम

पुणे शहर पोलिसांचे दामिनी मार्शल पथक लोकांमध्ये उतरुन लक्षणीय कामगिरी करत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून बाहेर गावावरुन अनेक तरुणी शहरामध्ये येत असतात. या सर्व तरुणींच्या सुरक्षेची जबाबदारी दामिनी पथक निभावते आहे. याचबरोबर महिला सुरक्षेसंदर्भात दामिनी पथकाचे अनेक स्त्युत्य उपक्रम सुरु असतात. यामध्ये शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन दामिनी महिला पोलीस तरुणींना मार्गदर्शन करत असतात. यामध्ये गुड टच – बॅड टच याबाबत जनजागृती केली जाते. त्याचबरोबर पॉस्को कायद्याविषयी माहिती देखील तरुणींना दिली जाते. महिलांच्या रक्षणासाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देखील दामिनी पथक शाळा-कॉलेजांमध्ये जात देत असते. याचबरोबर समाजातील विविध स्तरावरील, विभागामधील आणि वयोगटातील महिला, विद्यार्थिनी व जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत असतात. यामुळे समाज संरक्षित राहण्यास मोठा फायदा होत आहे.

Web Title: Pune police damini squad dissuades two women from committing suicide police news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल
1

महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक
2

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक

Ganeshotsav 2025 : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील गणेशोत्सव; डोळ्याचे पारणे फेडणारी 22 फूटी उंच गणपती मूर्ती
3

Ganeshotsav 2025 : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील गणेशोत्सव; डोळ्याचे पारणे फेडणारी 22 फूटी उंच गणपती मूर्ती

पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या
4

पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.