Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : पुणे रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; सात हजारांहून अधिक प्रकरणे नोंद

Pune railway division : पुणे रेल्वे विभागाने अनधिकृत विक्रेते आणि पिण्याच्या पाण्याच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान ७,११८ प्रकरणे नोंदवली गेली.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 27, 2026 | 12:30 PM
Pune Railway Actions

Pune Railway Actions

Follow Us
Follow Us:
  • पुणे रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका
  • सात हजारांहून अधिक प्रकरणे नोंद
  • १४० पाण्याचे बॉक्स जप्त
Pune Railway News Marathi : चंद्रकांत कांबळे : पुणे रेल्वे विभागाकडून अनधिकृत विक्रेते आणि अनधिकृत पिण्याचे पाणी (पीडीड्ब्ल्यू) विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ७ हजार ११८ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही कारवाई रेल्वेच्या व्यावसायिक विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या संयुक्त मोहिमेतून करण्यात आली.

हे देखील वाचा : Railway News : प्रवाशांना लुटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा दणका; 121 जणांवर दंडात्मक कारवाई

या कारवाईत आरपीएफ कडून ६,४०७ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली, तर व्यावसायिक विभागाकडून ३४८ जणांवर खटले दाखल करण्यात आले. या संपूर्ण कारवाईतून एकूण ५८ लाख ४८ हजार ३३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कारवाईचे प्रमाण अधिक दिसून आले. मे आणि जून महिन्यांत अनुक्रमे ७७४ आणि ८०५ प्रकरणे नोंदवली गेली, जे या कालावधीतील उच्चांक मानले जात आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांतही सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात आली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत अनुक्रमे ३३२ आणि ३०३ प्रकरणे समोर आली, तर १२ मार्च २०२६ पर्यंत ३० प्रकरणांची नोंद झाली आहे.
चौकट

१४० पाण्याचे बॉक्स जप्त

अनधिकृत पिण्याच्या पाण्याच्या विक्रीवरही कारवाई करण्यात आली. एकूण १,६८७ पाण्याच्या बाटल्या, म्हणजेच सुमारे १४० बॉक्स जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक ६२१ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. तसेच प्रवाशांनी फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच अन्न व पिण्याचे पाणी खरेदी करावे असे म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करण्यात आलेली कारवाई

महिना व्यावसायिक आरपीएफ दंड
एप्रिल ३२ ५४२ ४,७०,७७०
मे ८६ ६८८ ४,७९,९७०
जून ७६ ७२९ ५,१७,७७०
जूलै ५० ७३८  ४,८७,४७०
ऑगस्ट  ६० ७०० ४,९५,७७०
सप्टेंबर  २३ ७४३  ४,६२,८४०
ऑक्टोबर  १०१ ५३४ ५,०४,४२०
नोव्हेंबर ८४ ६६८ ५,०००,७०
डिसेंबर ४३  ४७६ ४,७५,०७०
जानेवारी ५०  २८२  ४,९९,७७०
फेब्रुवारी १०२  २८१ ५,०९,६४
१२ मार्च पर्यत ०४  २६  ४,४४,७७०
एकूण प्रकरणे – ७,११८ ५८,४८,३३०

हे देखील वाचा : Pune Mumbai Expressway Traffic : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pune railway crackdown illegal vendors 7 thousand cases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Pune
  • Railway News

संबंधित बातम्या

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
1

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
2

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू
3

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार
4

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.