Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषदेचा ‘सुपर निपुण’ शाळांकडे प्रवास; 200 गावांत ‘समर कॅम्प’चा शुभारंभ

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्यांत पारंगत करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2026 | 11:59 AM
पुणे जिल्हा परिषदेचा 'सुपर निपुण' शाळांकडे प्रवास; 200 गावांत 'समर कॅम्प'चा शुभारंभ

पुणे जिल्हा परिषदेचा 'सुपर निपुण' शाळांकडे प्रवास; 200 गावांत 'समर कॅम्प'चा शुभारंभ

Follow Us
Follow Us:

पुणे : शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्यांत पारंगत करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून, पुणे जिल्ह्यातील सुमारे २०० गावांमध्ये २९ एप्रिलपासून विशेष ‘ग्रीष्मकालीन शिबिरांचे’ (समर कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे. ‘सुपर निपुण’ शाळा घडवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.

राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल

‘निपुण महाराष्ट्र’ मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्हा परिषदेने ५३.६% प्रगती साध्य करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, हे यश येथेच मर्यादित न ठेवता, प्रत्येक विद्यार्थ्याला १०० टक्के ‘निपुण’ करण्यासाठी जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

स्वयंसेवकांसाठी विशेष कार्यशाळा

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी २९ एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील ३०० स्वयंसेवक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी साधायचा संवाद, भाषा आणि गणित कौशल्ये विकसित करण्याच्या प्रभावी पद्धती आणि शिबिराचे सूक्ष्म नियोजन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

खेळ आणि मनोरंजनातून शिक्षण

समर कॅम्पमध्ये केवळ पाठांतर न घेता, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने भाषिक व गणिती खेळ : पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी.

वाचन व कथाकथन : गोष्टी ऐकणे, सांगणे आणि त्यावर चर्चा करणे.

कला व अभिनय : चित्रकला, लेखन आणि नाट्यरूप सादरीकरण.

प्रदर्शन : शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले जाईल.

लोकसहभागातून गुणवत्तावाढ

हा उपक्रम केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता, यात स्थानिक सरपंच, पालक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे. सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

उपस्थित मान्यवर

या उपक्रमाच्या नियोजनात पुणे मॉडेल स्कूलचे सल्लागार सिद्धार्थ चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सल्लागार श्रीमती श्रेया बॅनर्जी, आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता वैशाली बच्छाव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे शंकर पौळ, ललिता भंडारे व त्यांच्या प्रशिक्षक टीमने मार्गदर्शन केले.

“या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल आणि ‘सुपर निपुण’ शाळांचे आमचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येईल, असा आम्हाला विश्वास आहे.” — गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

हे सुद्धा वाचा : सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

Web Title: Pune zilla parishad has launched a new initiative to improve the quality of school education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.