
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अनुभवली NASA ची सफर; 12 दिवसांत दिली विविध अभ्याकेंद्राना भेट
महाराष्ट्रातील दुसरी उपक्रमशील ठरली पुणे जिल्हा परिषद
बारा दिवसांत दिली विविध अभ्याकेंद्राना भेट
पुणे जिल्हा परिषद ही दुसरी उपक्रमशील जिल्हा परिषद ठरली
सोनाजी गाढवे /पुणे: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी १६ ते २७ नोव्हेंबर या बारा दिवसांत अमेरिकेतील नासाला भेट देत विज्ञान आणि शेतकरी कुटुंबातील २५ विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अनोख्या अविष्कारासह विविध अभ्यास केंद्रांतील तज्ञांशी संवाद साधला. जिल्हा परिषद पुणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला असून महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी नासा संस्थेची भेट राबविणारी पुणे जिल्हा परिषद ही दुसरी उपक्रमशील जिल्हा परिषद ठरली आहे.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या पुढाकारातून हा अभ्यास दौरा घेण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास या दौऱ्यामुळे झाला. मुंबई- अबुधाबी- व्हाया वॉशिंग्टन असा प्रवास करत विद्यार्थी अमेरिकेत दाखल झाले. यावेळी पुण्यातील आयुका संस्थेचे शास्त्रज्ञ समीर दुरडे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी १२ दिवसांत अनुभवली विविध अभ्यास केंद्रे
दिनांक १६ ते २७ नोव्हेंबर या काळात विद्यार्थ्यांनी उद्वार हेझी एअर अँड स्पेस म्युझियम, इंडियन ॲम्बेसी, स्मिथ सोनियन नॅशनल एअर ॲंड स्पेस म्युझियम, गोल्डन गेट ब्रिज, लोम्बार्ड स्ट्रीट, कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, डिज्नीलैंड, केनडी स्पेस सेंटर, एस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर, कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियम, टेक इटर ॲक्टिव म्युझियम, स्टॅन्ड फोर्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी भेट दिलीय तसेच २७ नोव्हेंबरला बंगलोर येथे आयुक्त व इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली.
बी. एड. प्रवेशाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ टक्क्यांहून अधिक प्रवेश
विद्यार्थी ठरले कौतुकास पात्र
वॉशिंग्टन डीसी येथे स्मिथ सोनियन नॅशनल एअर ॲंड स्पेस म्युझियमला भेटीदरम्यान भारतीय विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, साधलेला संवाद पाहून स्थानिक शिक्षक व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. भविष्यामध्ये अंतराळवीर व शास्त्रज्ञ बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ज्या गोष्टी, ठिकाणे संगणक व मोबाईलमध्ये पाहिली ती प्रत्यक्षात अनुभवास मिळाली याचा अत्यानंद आहे. प्रवासामध्ये अमेरिकन अधिकारी व ग्रामस्थांचा सुखकारक अनुभव आला. जिल्हा परिषद पुणे यांनी आमच्यासाठी बालवयामध्ये अमेरिकेचा अभ्यास दौरा अविस्मरणीय प्रसंग आहे.
– स्पृहा खेडेकर, विद्यार्थिनी