
पुण्यात पार पडणार Grand Challenge Tour
प्रमुख रास्ते बंद असल्याने वाहनचालकांना मनस्ताप
दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
पुणे: पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केला आहे. त्यानिमित वाहूतकीसाठी काही प्रमुख रस्ते बंद असणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ आज रोजी पुणे शहरात पार पडणार आहे. या रेसदरम्यान सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) तसेच या मुख्य मार्गांना जोडणारे सर्व उपरस्ते यांचा समावेश आहे. दरम्यान पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्यात आले असले तरी प्रमुख रास्ते व त्यांना जोडणारे उपरस्ते बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होण्याची शक्यता आहे. ऑफिस, किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी दूरवर पार्क करून चालत जावे लागणार आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
रस्ते बंद राहिल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. ही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रोलॉग सायकल स्पर्धेच्या निमित्ताने साेमवारी (१९ जानेवारी) शहर पोलिसांनी वाहतूक नियोजनासोबतच कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस आयुक्त तसेच पोलिस सहआयुक्त यांच्या देखरेखीखाली चार अतिरीक्त पोलिस आयुक्त, दहा पोलिस उपायुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यासह दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त उद्या ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद
असा आहे बंदोबस्त
अतिरीक्त पोलिस आयुक्त- ४
पोलिस उपायुक्त- १०
पोलिस अंमलदार- १५००
विशेष शाखा- एक टीम
गुन्हे शाखा- एक टीम
बीडीडीएस- १
क्युआरटी टीम- ९
दृष्टी- ५
आरसीपी-९