Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…

पुणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये दररोज १५ हजार पेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होते.यातील अनेक वाहनचालक प्रवाशांची वाट पाहत टर्मिनलच्या परिसरात तासन्‌तास थांबून राहतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2026 | 09:46 PM
Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…
Follow Us
Close
Follow Us:

वाहनचालकांनी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ
विमान टर्मिनलमध्ये थांबल्यास होणार दंडात्मक कारवाई
मार्च अखेर होणार नियमांची अंमलबजावणी

पुणे: पुणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई होणार असून यांची अंमलबजावणी मार्च अखेर पासून होणार आहे. वाहनचालकांनी प्रवाशांसाठी १५ मिनिटापेक्षा जास्त काळ थांबल्यास आर्थिक भुर्दंड सहन करावे लागणार आहे.या संदर्भात विमान (Pune News) प्रशासनाने ‘ड्वेल टाइम’चा म्हणजेच थांब्याचा कालावधीचा नियम लागू करत आहे.यासाठी कॅमेरे बसवले असून कॅमेऱ्याच्या माध्यामातून नियमापेक्षा जास्त वेळ थांबलेल्या वाहनांचा नंबर प्लेट स्कॅन करणार आहे.

पुणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये दररोज १५ हजार पेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होते.यातील अनेक वाहनचालक प्रवाशांची वाट पाहत टर्मिनलच्या परिसरात तासन्‌तास थांबून राहतात. परिणामी टर्मिनलमध्ये वाहनांची कोंडी होते.विशेषतः रात्रीच्या वेळी विमानांची वाहतूक जास्त असते, अशा वेळी कोंडी मोठ्या प्रमाणात होते. टर्मिनलच्या आत आणि बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना याचा थेट फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे.

‘एनपीआर’चे नियम

टर्मिनलच्या परिसरात विविध ठिकाणी सहा ‘एनपीआर’ कॅमेरे बसविले असून टर्मिनलमध्ये दाखल होणाऱ्या,बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या नंबर प्लेटवर नजर असणार आहे.तसेच नंबर प्लेट स्कॅन करून संबंधित वाहन किती वेळ टर्मिनलमध्ये थांबले आहे, हे देखील ठरविणार आहे.१५ मिनिटांपेक्षा अधिक वाहन थांबल्यास संबंधित वाहनाची माहिती यंत्रणेला दिली जाईल,व त्यानुसार वाहनचालकाकडून निर्धारित विशिष्ट दंड आकारले जाईल.

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी (दि.१०) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. या प्रकल्पासाठी आवश्य क जमीन अधिग्रहण प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

“… कार्यवाही पूर्ण करावी”: Purandar Airport बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरण (स्पेशल पर्पज व्हेइकल)ची स्थापना करणे, प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज उभारणे, एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी तयार करणे, त्यांच्याकडील भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी सोपवणे तसेच या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता, अशा सर्वंकष प्रस्तावाला यावेळी मान्यता देण्यात आली.

Web Title: Punishment for waiting more than 15 minutes in pune airport terminal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Pune Airport
  • pune news

संबंधित बातम्या

ऊसतोड कामगारांसह कुटुंबीयांसाठी प्रकल्प कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणार
1

ऊसतोड कामगारांसह कुटुंबीयांसाठी प्रकल्प कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणार

Pune ZP President : राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात…
2

Pune ZP President : राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात…

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
3

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय
4

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.