Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याबाबत भारतीय सरपंच परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 02:59 PM
ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित
  • भारतीय सरपंच परिषद आक्रमक
  • राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा
यवत : राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याबाबत भारतीय सरपंच परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. ठराविक दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय संपावर जाणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या दिवशी गावपातळीवरील दैनंदिन कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे.

 

परिषदेच्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे १६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे किंवा लवकरच संपणार आहे. मात्र शासनाने नियोजित वेळेत निवडणुका न घेता अनेक ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे लोकशाही प्रक्रियेला धक्का बसत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता कमी होत असल्याचा आरोप परिषदेकडून करण्यात आला आहे.

लोकनियुक्त प्रतिनिधींच्या ऐवजी प्रशासकांकडून कारभार चालविल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. निधी नियोजन, स्थानिक गरजांनुसार निर्णय आणि तातडीची कामे यामध्ये विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार असूनही प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत नसल्याने असंतोष वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी आंदोलनाची घोषणा करताना शासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीवर ग्रामपंचायत प्रतिनिधींचा समावेश अनिवार्य करणे, सरपंच व उपसरपंच यांचे थकीत मानधन तातडीने अदा करणे, विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतींना मतदानाचा अधिकार देणे, तसेच ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक ऑपरेटरांच्या सेवाप्रश्नांचा कायमस्वरूपी तोडगा काढणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामपंचायतींच्या आर्थिक व प्रशासकीय अधिकारात वाढ करून त्यांना अधिक सक्षम करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता

दरम्यान, संपाच्या दिवशी ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहिल्यास जन्म-मृत्यू दाखले, कर वसुली, पाणीपुरवठा, स्वच्छता सेवा, विविध प्रमाणपत्रे आणि सुरू असलेली विकासकामे यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढू शकते. राज्य सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार, निवडणुकांबाबत काय निर्णय होणार आणि सरपंच परिषदेच्या मागण्यांवर काय तोडगा निघणार, याकडे राज्यातील ग्रामपंचायती व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

शासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

राज्य शासनाने यापूर्वी सहकारी बँका, नगरपरिषद, नगरपालिकां तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका दीर्घकाळ लांबवल्या होत्या. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांबाबतही दिरंगाई होत असल्याने शासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही प्रकरणांमध्ये याविरोधात न्यायालयीन पातळीवरही दाद मागण्यात आली आहे. ग्रामीण भागात शासनाविरोधात नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे, असं भारतीय सरपंच परिषदेकडून सांगितले.

Web Title: The bharatiya sarpanch parishad has warned of a statewide protest over the failure to hold gram panchayat elections soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • gram panchayat
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
1

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Pune News : सामाजिक सलोख्याचा पुण्यातून निर्धार ! परवानगीशिवाय पुतळे बसवले जाऊ नयेत !
2

Pune News : सामाजिक सलोख्याचा पुण्यातून निर्धार ! परवानगीशिवाय पुतळे बसवले जाऊ नयेत !

दिव्यांगांच्या हक्कावर शासनाची कुऱ्हाड; तात्पुरते प्रमाणपत्र असणारे बालके योजनांपासून वंचित
3

दिव्यांगांच्या हक्कावर शासनाची कुऱ्हाड; तात्पुरते प्रमाणपत्र असणारे बालके योजनांपासून वंचित

Pune Rain News : दोन दिवसाच्या अवकाळीने पुणं तुंबलं! खरं कारण काय? आदित्य ठाकरेंनी केला पर्दाफाश
4

Pune Rain News : दोन दिवसाच्या अवकाळीने पुणं तुंबलं! खरं कारण काय? आदित्य ठाकरेंनी केला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.