Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

मिळकत करात प्रस्तावित केलेली पाच टक्के करवाढ बुधवारी फेटाळण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला. यामुळे पुणेकरांवरील करवाढीचे संकट टळले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 01:48 PM
मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

पुणे : अपेक्षेनुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मिळकत करातील वाढीचा प्रस्ताव फेटाळला आहे. याचवेळी नगरसेवकांनी मिळकत कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करीत, झारीतील शुक्राचार्य शाेधुन काढा असे मतही मांडले. यानिमित्ताने समाविष्ट गावांतील मिळकत कराचा विषय पुन्हा एकदा चर्चिला गेला.

महापालिका प्रशासनाने मिळकत करात दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला हाेता. स्थायी समितीने ताे मंजुरही केला हाेता. परंतु प्रत्यक्षात मुख्य सभेपुढे हा प्रस्ताव आणताना त्यामध्ये पाच टक्के वाढ सुचविली गेली हाेती. मिळकत करात प्रस्तावित केलेली पाच टक्के करवाढ बुधवारी फेटाळण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला. यामुळे पुणेकरांवरील करवाढीचे संकट टळले आहे. महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेत सत्ताधारी झालेले भाजप पहिल्याच वर्षी पुणेकरांवर करवाढ लादणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

 

सत्ताधाऱ्यांनी टाळला निर्णय

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त नवल किशोर राम यांनी करवाढ १० टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. चार वर्षानंतर महापालिकेतील प्रशासकराज संपुष्टात आले. निवडणुका झाल्याने लोकप्रतिनिधी सभागृहात आले आहेत. त्यामुळे करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे संपूर्ण खापर सत्ताधारी भाजपावर फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे हा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला. दरम्यान, सर्वसाधारण सभेत मिळकतकर विभागाच्या कारभारावर टीका करण्यात आली. मोठ्या प्रमाणात मिळकत कराची थकबाकी प्रलंबित आहे. याचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सभागृहासमोर ठेवावा, असे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले.

समाविष्ट गावांबाबतही चर्चा

समाविष्ट गावातील थकीत मिळकत कराबाबत निर्णय घेतला जात नाही. अधिक दराने मिळकत कर घेतला जातो. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सुविधा मिळतील असे वाटले होते. पण अनेक पायाभूत सुविधा मिळत नाही. समाविष्ट गावातील कर आकारणी बाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. पाच पट मिळकत कर घेतला जातो, हे बदलले पाहिजे. महापालिकेत आलोय त्यातील एकही अपेक्षा पूर्ण झाली नाही, असे सुभाष नाणेकर म्हणाले.

या नगरसेवकांनीमिळकत करविभागावर ओढले ताशेेरे

सर्वसाधारण सभेत वर्षा तापकीर, दिलीप वेडे पाटील, अजित घुले, अमाेल बालवडकर, अजय खेडेकर, सचिन दाेडके, अर्चना पाटील, सुभाष नाणेकर, काका चव्हाण, विराेधी पक्षनेते निलेश निकम यांनी मिळकत कराच्या प्रस्तावावर मत मांडताना, प्रशासनावर जाेरदार टिका केली. नागरीकांना कर भरायचा आहे, परंतु मिळकत कर विभागातील कर्मचारी वेळेवर त्यांचे अर्ज निकाली काढत नाही. त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात, मिळकतीचे मुल्यांकन वेळेवर केले जात नाही, वापरातील बदलाकडे दुर्लक्ष केले जाते. वारसनाेंद करण्यात अडचण आणली जाते, क्षेत्रफळ दुरुस्तीत नागरीकांना त्रास दिला जाताे अशा तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या.

Web Title: After forming power in pune municipal corporation bjp has taken a big decision for the citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
2

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
3

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
4

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.