नवी दिल्ली : बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते गेल्या काही वर्षापासून कॅन्सरशी झुंज देत होते. यानंतर सोशल मीडियावर अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. पुण्यातील आकर्डी येथील बजाजच्या प्लांटमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
राहुल बजाज यांना २००१ साली केंद्र सरकारने उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. ते काही काळ राज्यसभेचे खासदारही होते. त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते.
[read_also content=”सीएम उमेदवाराच्या घोषणेनंतर सिद्धू निवडणूक प्रचारातून गायब, पत्नी म्हणते… https://www.navarashtra.com/india/sidhu-disappeared-from-election-campaign-after-the-announcement-of-cm-face-wife-said-this-237053.html”]
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. ते स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू होते. राहुल बजाज यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल, सेंट स्टीफस कॉलेज-दिल्ली, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई आणि कैथड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. २००६ ते २०१० या काळात ते राज्यसभेचे खासदारही होते. १९७९-८० आणि १९९९-२००० या काळात राबल बजाज उद्योगांची संघटना सीआयआयचे अध्यक्षही होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना २०१७ साली सीआय़आय जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
[read_also content=”एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट आहे https://www.navarashtra.com/maharashtra/st-workers-strike-gopichand-padalkar-criticized-on-mahavikas-aaghadi-nrps-237043.html”]
प्रसिद्ध उद्योगपती अशी राहुल बजाज यांची ओळख होती. गेल्या वर्षी २९ एप्रिलला त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वाढत्या वयाचे कारण देत त्यांनी हे पद सोडले होते. १९७२ पासून ते ग्रुपचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना चेअरमन अमेरिटेस् हे पद देण्यात आले होते. तर नीरज बजाज यांना नॉन एक्स्झिक्युटिव्ह अध्यक्ष करण्यात आले होते.