Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांसामोर Weather पण फेल! काय ती हवा, काय ते तापमान अन्…; वाचा सविस्तर…

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, शिवाजीनगरसारख्या मोकळ्या आणि हिरवाई असलेल्या भागांत रात्री उष्णता वेगाने निघून जात असल्याने थंडी तीव्र जाणवते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 13, 2026 | 08:48 PM
पुणेकरांसामोर Weather पण फेल! काय ती हवा, काय ते तापमान अन्…; वाचा सविस्तर…
Follow Us
Follow Us:

पुणेकरांना एकाच दिवशी तिन्ही ऋतूंचा अनुभव
एका दिवसात किमान तापमानात चार अंश सेल्सिअसची वाढ
काही भागांत हलक्या पावसाची हजेरी

पुणे: पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. १३) हवामानातील मोठ्या चढ-उतारामुळे नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव घ्यावा लागला. अवघ्या एका दिवसात किमान तापमानात चार अंश सेल्सिअसची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन तर सायंकाळी काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली.

सोमवारी (ता. १२) पुण्यात किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस होते. मात्र मंगळवारी ते थेट १४.८ अंशांपर्यंत वाढले. त्याचबरोबर कमाल तापमानही ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या अचानक बदलाचा परिणाम शहराच्या हवामानावर स्पष्टपणे जाणवला. पहाटे थंडी, दुपारी उष्णता आणि सायंकाळी ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरी अशा बदलत्या स्थितीमुळे पुणेकरांना एका दिवसात तिन्ही ऋतूंचा अनुभव आला.

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान, गेल्या काही दिवसात शहरात तापमानातील तीव्र विषमता देखील पुढे आली आहे. अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात सहा ते सात अंशांचा फरक दिसून आला.शिवाजीनगर परिसरात किमान तापमान १०.९ अंश, हवेली तालुक्यात १०.१ अंश इतके कमी नोंदले गेले, तर मगरपट्टा १६.९, लोहगाव १६.२ आणि कोरेगाव पार्क १४.९ अंश सेल्सिअस इतके अधिक तापमान नोंदविण्यात आले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, शिवाजीनगरसारख्या मोकळ्या आणि हिरवाई असलेल्या भागांत रात्री उष्णता वेगाने निघून जात असल्याने थंडी तीव्र जाणवते. तर दाट लोकवस्ती, काँक्रीटची बांधकामे आणि आयटी हब असलेल्या भागांत उष्णता साठून राहते, त्यामुळे रात्रीही तापमान जास्त राहते.पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून किमान तापमान सुमारे १४ अंश राहील. मात्र शनिवारपासून पुन्हा किंचित घट होऊन किमान तापमान १२ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पुण्यात तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत.

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

हुडहुडी कमी होणार!

नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील थंडीचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला. यातून गेले दोन महिने तीव्र थंडी सोसणाऱ्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशाना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Rain cold and summer in one day at pune city latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • Pune Rain
  • Pune Weather
  • Weather

संबंधित बातम्या

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
1

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.