पुणे: पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रक्कम ग्रामीण पोलिसांनी जप्त केली. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यापाठोपाठ कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनीही या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. “खेड शिवापूर टोल नाक्यावर जी गाडी पकडण्यात आली त्या गाडीत शहाजी बापू पाटील यांची माणसे होती. सुरूवातीला गाडीत 15 कोटी सापडल्याची माहिती समोर आली होती. पण त्या पंधरा कोटींचे पाच कोटी कसे झाले हे समजलंच नाही. गाडी चालकानेच हे पैसे शहाजी बापू पाटील यांचे असल्याच सांगितले. पण तरीही कोणतीही तक्रार दाखल कऱण्यात आली नाही की संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ” असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
हेही वाचा: खेड-शिवापूर टोलनाक्यावर मिळालेली पाच कोटींची रक्कम कुणाची? संजय राऊतांचा गंभीर आरोप
तर दुसरीकडे, याच प्रकरणात आणखी एक अपडेट मिळाली आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर ज्या गाडीतून पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली. त्या गाडीतून प्रवास करणाऱ्यांची नावेही समोर आली आहे. सागर सुभाष पाटील, रफीक अहमह नजीर, बाळासाहेब आण्णासाहेब आसबे, शशिकांत तुकाराम कोळी अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघेही सांगोल्यातील रहिवासी आहेत. यातील बाळासाहेब आसबे हे कंत्राटदार आहेत. तर शशिकांत कोळी हे वाहन चालवत होते.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही माहिती दिली आहे. ज्या कारमधून पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली . ती कंत्राटदाराची आहे. कारमध्ये एकून पाच कोटींची रक्कम होती. यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवण्यात आले आहे. सर्व रक्कम ट्रेझरीत जमा केली असून ती रक्कम खरी आहे.”
हेही वाचा: Vidhansabha 2024: निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये हलचालींना वेग, ईव्हीएम सुरक्षा