Photo Credit- Social Media (खेड-शिवापूर टोल नाक्यावर मिळालेल्या पाच कोटींच्या रकमेबाबत संजय राऊतांचा गंभीर आरोप)
पुणे: विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना राज्यात आचारसंहित लागू झाली आहे. अशातच पुण्यातील पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांनी काल पाच कोटींची रक्कम जप्त केली. पोलिसांनी गाडीचालकाची चौकशी करून त्याला सोडून दिले आणि रोख रक्कम जप्त केली. तर ही रक्कम ज्या वाहनातून जप्त करण्यात आली, त्या वाहनमालकाचे नाव अमोल नलावडे असे आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
खेड शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम पोलीस चौकीत नेण्यात आली. निवडणूक निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनाही कारवाईसाठी बोलवण्यात आले. पण यानंतर मात्री या कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर शिंदे गटावर आरोप केला आहे.
हेही वाचा:ठाकरे- काँग्रेस वाद संपणार; काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांवर मोठी जबाबदारी
“मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे ट्विट करत संजय राऊतांनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, संबंधित कारमध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम कुठून आली, ती कुठे घेऊन जात होते, इतके पैसे कुणाचे आहेत. यासंदर्भात पोलीस, प्रांताधिकारी, निवडणूक विभागाचे अधिकारी, इन्कम टॅक्सचे अधिकारी यांपैकी कुणाही माहिती देण्यास तयार झाले नाही. ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली ती MH45 AS2526 या क्रमांकाची असून ती सांगोला येथील अमोल नलावडे यांच्या नावावर आहे. पण या कारवाईत पुढे काय झाले, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा:भारतापासून केवळ 4 तासांच्या अंतरावर आहे हे सुंदर बेट, प्रवेशासाठी व्हिसाची गरज नाही
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जवळपास 776 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर 31 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या माध्यमातून बेकायदा पैसे, ड्रग्ज आणि इतर मौल्यवान वस्तूंह जवळपास 31 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त कऱण्यात आली आहे.