Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

शहरात वाढती वाहतूक, नियमभंग करणारे वाहनचालक आणि वारंवार होणारे अपघात हे मोठे आव्हान ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अर्चना गायकवाड यांनी ‘नवराष्ट्र’शी खास संवाद साधला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2025 | 02:35 AM
पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/चंद्रकांत कांबळे: शहरात वाढती वाहतूक, नियमभंग करणारे वाहनचालक आणि वारंवार होणारे अपघात हे मोठे आव्हान ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अर्चना गायकवाड यांनी ‘नवराष्ट्र’शी खास संवाद साधला. त्यांनी वाहतूक शिस्त राखण्यासाठीचे प्रयत्न, नियम मोडणाऱ्यांवरील कारवाई, विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा धडे, स्कूल बस तपासणी, तसेच आरटीओकडून सुरू असलेल्या नवीन प्रकल्पांबाबत या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.

प्रश्न: पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहतूक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आरटीओकडून कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न केले जात आहेत?

उत्तर: वाहतूक शिस्त राखणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. गाडी चालवताना नियम पाळणे हे चालकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आरटीओ किंवा पोलिसांवर जबाबदारी ढकलणे योग्य नाही. आरटीओ आपले काम करत आहे, मात्र गाडी चालवणाऱ्यांनी स्वतःहून ठरवून शिस्त पाळली तरच सुरक्षित आणि व्यवस्थित प्रवास शक्य आहे.

प्रश्न: नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर ‘ऑन द स्पॉट’ दंड आकारणीसाठी कोणती यंत्रणा वापरली जाते?

उत्तर: ई-चलानच्या माध्यमातून कारवाई केली जाते. नियम मोडल्यास त्यांच्यावर दंड आकारला जातो. तो दंड तत्काळ किंवा त्यांच्या सोयीनुसार नंतर भरता येतो.

प्रश्न: दहा लाख विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे देण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याची कल्पना कशी सुचली?

उत्तर: एखाद्या अपघातात तीनपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्यास विभागप्रमुखांनी घटनास्थळी जाऊन तपास करावा लागतो. अनेक अपघात पाहताना मी विचार केला की, असे अपघात होऊ नयेत यासाठी आपण काय करू शकतो? शाळेत शिकवलेली गोष्ट कायम लक्षात राहते, म्हणून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे द्यावेत असे ठरवले. जेव्हा हे विद्यार्थी १८ वर्षांचे होऊन वाहन परवाना घेतील, तेव्हा त्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व समजलेले असेल. यामुळे स्वअनुशासन पाळणारे वाहनचालक घडतील.

प्रश्न: रस्ता सुरक्षा प्रशिक्षणाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार आहे?

उत्तर: यासाठी आपण जून महिन्यातच सुरुवात करणार होतो, पण पावसामुळे आणि आषाढी वारीमुळे ते पुढे ढकलावे लागले. आता लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होईल. शनिवारी दप्तरविरहित शाळांच्या उपक्रमात दिवे घाट येथे ६ हजार झाडे लावली आहेत. या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना रोड सेफ्टीचे धडे दिले जातील. यामध्ये रोड सेफ्टीविषयी व्हिडिओ दाखवले जातील, चित्रकला स्पर्धा, सुविचार पोस्टर्स, तसेच सापशिडीच्या माध्यमातून संदेश दिले जातील. शाळेच्या बस चालकांनाही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. ॲम्बुलन्स किंवा फायर ब्रिगेडसारख्या आपत्कालीन वाहनांना प्राधान्य कसे द्यावे हेही शिकवले जाणार आहे.

प्रश्न: स्कूल बस आरटीओचे नियम पाळतात का? तपासणी किती वेळा केली जाते?

उत्तर: स्कूल बसची तपासणी वेळोवेळी केली जाते. शाळा सुरू होण्याआधी मे महिन्यात एकदा तपासणी होते. तसेच सुट्टीच्या दिवशी शनिवारी-रविवारीही गाड्यांची तपासणी सुरूच असते. नियमावलीनुसार स्कूल बस असणे अत्यावश्यक आहे जो नियमांचा भंग करतो त्यांच्यावर दंडात्मक करवाई केली जाते.

प्रश्न: आपल्या विभागात नवीन कोणते प्रकल्प सुरू आहेत?

उत्तर: आळंदी रोड, हडपसर, दिवे घाट येथे तीन ठिकाणी ऑटोमॅटिक ड्रायव्हर टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) सुरू करण्याचे काम चालू आहे. तसेच दिवे घाट येथे गाड्यांच्या पासिंगसाठी (आयएनसी) सेंटर ही सुरू होत आहे. यामुळे वाहनचालकांना पक्का परवाना मिळवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. आमच्या विभागामार्फत हे नवीन प्रकल्प राबवले जात आहेत.

 

Web Title: Rto office archna gaikwad special interview with navarashtra about traffic accident in pune city marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Pune Traffic
  • RTO

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
1

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
2

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
3

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
4

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.