पुणे: कोविड काळात नागरिक तसेच विविध कंपन्यांनी पुणे महापालिकेला कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून असल्याची बाब समाेर आली आहे. या निधीचा उपयाेग करावा अशी मागणी दिड वर्षापुर्वी केल्यानंतरही एक रुपयाही खर्च केला गेला नसल्याची टीका सजग नागरीक मंचने केली आहे.
कोविड जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मार्च २०२० मध्ये कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत अनेक नागरिक व कंपन्यांनी पुणे महापालिकेला २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी तर २०२१-२२ मध्ये ३.१० कोटी एवढ्या रकमेच्या देणग्या दिल्या. मात्र महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये करोना बेड व ऑक्सिजन वर खर्च केले. आजवर यातील शिल्लक रकमेवर ७० लाख रुपये व्याज महापालिकेला मिळाले आहे व आज रोजी या कोविड सीएसआर खात्यात ७.४३ कोटी रुपये पडून आहेत, याकडे सजग नागरीक मंचचे विवेक वेलणकर यांनी लक्ष वेधले.
करोना काळात नागरीकांचे झालेले प्रचंड हाल बघता देणगी म्हणून आलेले कोट्यावधी रुपये खर्च न करू शकण्याचा करंटेपणा करणार्या पुणे महापालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे वेलणकर म्हणाले. याविषयी त्यांनी महापािलका अायुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांना निवेदनदिले. प्रशासन प्रमुख म्हणून यामध्ये आपली जबाबदारी मोठी आहे. जुलै २०२३ मध्ये माहिती अधिकारात मी यासंबंधीची माहिती मिळवून उघडकीस आणली होती , अपेक्षा अशी होती की तातडीने यावर काही तरी निर्णय होईल.
आजच्या सोमवारच्या माहिती अधिकार दिनात पुन्हा एकदा माहिती घेतली असता , गेल्या दीड वर्षातही या रकमेतील एकही रुपया महापालिका खर्च करु शकलेली नाही. ही बाब अत्यंत उद्वेगजनक आहे, असे वेलणकर यांनी अायुक्त भाेसले यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून पुणे महापालिका इस्पितळे आणि दवाखाने यामध्ये आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
HMPV व्हायरसबाबत पुणे महापालिका अलर्ट; नायडू रुग्णालयात 300 बेड राखीव
चीनमध्ये फैलावलेल्या ‘एचएमव्हीपी’ या विषाणूमुळे हाेणाऱ्या संसर्गज्य आजाराच्या पार्श्वभुमीवर महापािलकेचा आरोग्य विभाग अलर्ट माेडवर आला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या सुचनेनुसार कार्यवाही सुरु केली असुन, नायडू रुग्णालयात साडे तीनशे बेड राखीव ठेवण्यात आले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचे स्क्रीनिंग करण्याविषयी तयारी सुरु केली आहे.
एचएमव्हीपी या विषाणूचा चीन मध्ये फैलाव झाला आहे. तसेच मलेशिया मध्ये या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहे. त्यानुसार पुणे महापािलकेने कार्यवाही करण्यास सुरुवात केली.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या आरोग्य विभागांसाठी नियमावली तयार केली आहे. याबाबत शुक्रवारी (ता.३) आणि सोमवारी (ता.६) रोजा राज्य शासनाची बैठक पार पडली. त्यावेळी ही नियमावली जाहीर केली असून महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयांना पाळण्याचे आदेश दिले आहेत.