मात्र यावर्षी कोणताही वाद-विवाद तंटा न होता वारकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन मिळाले आणि वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला….निरा नदित पादुकांच्या स्नानानंतर सोहळा मालकांनी प्रथम रथा मागील व नंतर रथा पुढील विणेकऱ्यांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांन माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन दिले. यानंतर वारकऱ्यांनी पुन्हा एकदा “माऊली माऊली” चा गजर करत माऊलींच्या या मार्गावर नतमस्तक होत पायी चालण्यास सुरुवात केली. नीरा येथील विठ्ठल मंदिरामध्ये माऊलींच्या या सोहळ्याला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दुपारचे भोजन देण्यात आले.दुपारी दोन वाजेपर्यंत विसावा घेतल्या नंतर माऊलींचा पालखी सोहळा दुपारी दोन वाजता मुक्कामासाठी वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला .