
मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…
कार्यशाळांमध्ये मॅजिक स्नो निर्मिती, क्रिस्टल स्नोफ्लेक्स प्रयोग, रंग बदलणाऱ्या रासायनिक प्रतिक्रिया, तसेच सर्किट्स व ट्रान्झिस्टरच्या साहाय्याने दैनंदिन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कार्य, ऊर्जा पुरवठा आणि तर्कशक्तीवर आधारित प्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. यासोबतच सीपीयू उघडणे व पुन्हा जोडण्याची संवादात्मक कार्यशाळा हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
विज्ञान स्पर्धांचे वेळापत्रक
मोनोॲक्ट स्पर्धा
दि. २४ वेळ : स. ११ ते सायं. ५
(इयत्ता ४ थी ते ९ वी | कालावधी : ३ ते ५ मिनिटे)
चित्रकला स्पर्धा
दि. ३१ वेळ : स. ११ ते १२.३०
(इयत्ता १ ली ते ९ वी)
विज्ञान कथा लेखन स्पर्धा
दि. ७ फेब्रुवारी २०२६ | वेळ : सकाळी ११ ते १२
(इयत्ता ७ वी ते पदवी | ४०० ते ६०० शब्द)
विज्ञान प्रकल्प स्पर्धा
दि. १४ फेब्रुवारी २०२६ | वेळ : सकाळी ११ ते सायं. ५
(इयत्ता ६ वी ते ९ वी)
“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद
सायन्स रील स्पर्धा
दि. १५ फेब्रुवारी २०२६
(इयत्ता ८ वी ते पदवी | कालावधी : १ मिनिट)
सर्व स्पर्धांचे पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.स्पर्धांसाठी नोंदणी व साहित्य अपलोड करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२६ आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी https://sciencepark.unipune.ac.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सीएसइसी येथे सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत विविध वैज्ञानिक मॉडेल्स व प्रयोगांचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून, केंद्रातील उपक्रमांची सविस्तर माहितीही यावेळी दिली जाणार आहे.