Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’ परिसरात निवासी क्षेत्र करण्याची सिंधीया ट्रस्टची मागणी; महानगरपालिकेची भूमिका काय?

महादजी शिंदे यांनी वानवडी येथे महादेवाचे मंदिर बांधले आहे. त्यांच्या निधनानंतर मंदिरापुढे छत्री बांधून स्मारक करण्यात आले आहे. या स्मारकाला पुणे महापालिकेने पुरातत्त्व वास्तू दर्जाचा दर्जा दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 14, 2025 | 09:23 PM
ऐतिहासिक 'शिंदे छत्री' परिसरातील जागेवर निवासी क्षेत्र करण्याची सिंधीया देवस्थान ट्रस्टची मागणी; महानगरपालिकेची भूमिका काय?

ऐतिहासिक 'शिंदे छत्री' परिसरातील जागेवर निवासी क्षेत्र करण्याची सिंधीया देवस्थान ट्रस्टची मागणी; महानगरपालिकेची भूमिका काय?

Follow Us
Follow Us:

पुणे: वानवडी येथील ऐतिहासिक शिंदे छत्रीच्या परिसरातील जागेवरील उद्यानाचे आरक्षण उठवून ते निवासी क्षेत्र करण्याची मागणी सिंधीया देवस्थान ट्रस्टने राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे. या अनुषंगाने नगरविकास विभागाचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांची सोमवारी दृकश्राव्य माध्यमातून बैठक झाली. यावेळी 70 टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात तर 30 टक्के जागा जागामालकास विकसित करण्यास द्यावी, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. तसेच याचा निर्णय शासनस्तरावर घ्यावा, असेही म्हटले आहे.

महादजी शिंदे यांनी वानवडी येथे महादेवाचे मंदिर बांधले आहे. त्यांच्या निधनानंतर मंदिरापुढे छत्री बांधून स्मारक करण्यात आले आहे. या स्मारकाला पुणे महापालिकेने पुरातत्त्व वास्तू दर्जाचा दर्जा दिला आहे.  याच स्मारकाला लागून असलेल्या जागेवर महापालिकेच्या 1966, 1987 च्या विकास आराखड्यात उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. हे आरक्षण 2017 च्या विकास आराखड्यात कायम ठेवण्यात आले आहे.

ही जागा सिंधिया देवस्थान ट्रस्टची असून ती 13 हजार 514 चौरस मीटरचा आहे. त्यापैकी 9 हजार 736 चौरस मीटर च्या जागेवर उद्यानाचे आरक्षण आहे. या आरक्षणाच्या जागेत 1964 ते 1968 या कालावधीत बैठी घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, त्यांची सोसायटी स्थापन झालेली नाही. ट्रस्टचे मुखत्यार यशवंत भोसले यांनी वानवडी सर्वे क्रमांक 75 मधील या जागेवरील उद्यानाचे आरक्षण वगळावे, अशी मागणी राज्याच्या नगर विकास विभागाकडे केली आहे.

निवासी आरक्षण

नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र दिले आहे. भोसले यांची विनंती लक्षात घेऊन उद्यानाचे आरक्षण वगळून हा भाग निवासी करण्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमचे कलम 37 अन्वये प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास त्यावर शासनाला निर्णय घेता येऊल, असे कळवले आहे.

अंतिम निर्णय राज्य शासनाकडे

या पत्राला उत्तर देताना पुणे महापालिकेने युडीपीसीआरमध्ये नमूद केलेल्या नियमाप्रमाणे 70 टक्के जागा महापालिकेकडे हस्तांतरित करून उर्वरित 30 टक्के जागा संबंधित ट्रस्टला देता येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच 2017 चा विकास आराखडा तयार करताना उद्यानाच्या आरक्षणावर आक्षेप घेतल्याच दिसून येत नाही. असेही नमूद केले आहे. आरक्षण उठविण्यासंदर्भात शासनाने एमआरटीपी अ‍ॅक्ट कलम 37 (1) नुसार निर्देश दिल्यास महापालिकेला आरक्षण उठविण्याची कारवाई करता येईल. मात्र, आरक्षण उठविण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेणे, योग्य ठरेल, असेही उत्तरात म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात नगरविकास विभागाचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांची सोमवारी दृकश्राव्य माध्यमातून बैठक झाली. आयुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, शिंदे छत्रीच्या बाजूला उद्यान असून, तेथे सुशोभीकरण करण्यावर चर्चा झाली आहे.

Web Title: Scindia family demand residential area at shinde chatri area pune carporation and urban development ministry meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.