Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Marathon: मनीष आणि राहुल यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमागे प्रशिक्षक विजय बनसोड तसेच ‘टीम स्पोर्टिफाय’ यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली अनेक महिन्यांची कठोर आणि नियोजनबद्ध तयारी होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 06:30 PM
Ultra Marathon

Ultra Marathon

Follow Us
Follow Us:
  • मनीष, राहुलची खारदुंगला चॅलेंजमध्ये यशस्वी कामगिरी
  • ७२ किमीची खडतर अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण
  • लडाखच्या १७ हजार फुटांहून अधिक उंचीवर घेतली कसोटी
पुणे/Marathon: पुण्यातील ‘टीम स्पोर्टिफाय’च्या दोन क्रीडापटूंनी लडाखमधील अत्यंत खडतर मानली जाणारी ७२ किलोमीटरची ‘खारदुंग ला चॅलेंज २०२६’ ही अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करून पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुण्यातील मनीष धामंगे आणि राहुल गुरुंग यांनी शुक्रवारी, ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या आव्हानात्मक शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत शर्यत वेळेत पूर्ण केली.

या अत्यंत अवघड शर्यतीत मनीष धामंगे यांनी ११ तास ४६ मिनिटे २५ सेकंद (११:४६:२५) अशी वेळ नोंदवली, तर राहुल गुरुंग यांनी १२ तास ०७ मिनिटे ४७ सेकंद (१२:०७:४७) वेळेत ही ७२ किलोमीटरची अंतर शर्यत पूर्ण केली. लडाखच्या अत्यंत आव्हानात्मक आणि प्रतिकूल हवामानात दोन्ही धावपटूंनी आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची पराकाष्ठा करत हे यश मिळवले.

ही शर्यत समुद्रसपाटीपासून १७ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या जगप्रसिद्ध ‘खारदुंग ला’ या खिंडीतून जाते. अतिउंचीवर असणारी विरळ हवा, ऑक्सिजनची अत्यंत कमी पातळी, श्वास घेण्यास होणारा त्रास आणि अचानक बदलणारे गोठवणारे हवामान यामुळे ही शर्यत जगातील सर्वात कठीण मॅरेथॉनपैकी एक मानली जाते. अशा परिस्थितीत धावण्यासाठी केवळ शारीरिक ताकदच नाही, तर प्रचंड मानसिक खंबीरपणाची गरज असते.

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल

मनीष आणि राहुल यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमागे प्रशिक्षक विजय बनसोड तसेच ‘टीम स्पोर्टिफाय’ यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली अनेक महिन्यांची कठोर आणि नियोजनबद्ध तयारी होती. या सरावामध्ये लांब पल्ल्याचे धावणे, डोंगराळ भागात चढ-उताराचे प्रशिक्षण, सहनशक्ती वाढवणारे विशेष व्यायाम आणि उंचावरील प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेण्यासाठी केलेले विशेष सरावसत्र समाविष्ट होते.

या कामगिरीबद्दल बोलताना प्रशिक्षक विजय बनसोड म्हणाले, “खारदुंग ला ही केवळ ७२ किलोमीटर धावण्याची शर्यत नसून, ती शिस्त, संयम आणि मानवी जिद्दीची खरी कसोटी असते. मनीष आणि राहुल यांनी सरावादरम्यान दाखवलेली निष्ठा आणि कठोर मेहनत याचेच हे फळ आहे. त्यांचे हे यश ‘टीम स्पोर्टिफाय’सह संपूर्ण पुणेकर धावपटूंच्या समुदायासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण आहे.”

Satara Half Marathon: धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू

Web Title: Manish dhamange and rahul gurung complete 72 km ultra marathon in ladakh khardung la pass sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Ladakh
  • Marathon
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
1

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
2

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
3

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
4

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.