Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील ७२ मतदार प्रतिनिधी एकत्र आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्या उपस्थितीत  एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच सत्कार समारंभ पार पडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2026 | 01:32 PM
PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
Follow Us
Follow Us:

चाकण शहर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील ७२ मतदार प्रतिनिधी एकत्र आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्या उपस्थितीत  एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच सत्कार समारंभ पार पडला. खेड तालुक्यातील विविध सहकारी संस्थांमधून नव्याने निवडून आलेल्या मतदार प्रतिनिधींचा यावेळी फेटे बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित प्रतिनिधींनी मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील गटाने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे.

निमगाव खंडोबाच्या चरणी एकजुटीचा कौल

मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ असलेले मतदार प्रतिनिधी निमगाव येथील कुलदैवत श्री खंडोबाच्या मंदिरात जाऊन एकजुटीचा कौल देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देवाच्या साक्षीने एकत्रितपणे पाठिंबा व्यक्त करण्याचा निर्धार प्रतिनिधींनी केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विरोधी गटाकडे सध्या ३१ मतदार प्रतिनिधी असल्याचा दावा मोहिते पाटील समर्थकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ७२ विरुद्ध ३१ अशी संख्या समोर येत असून, या आकडेवारीमुळे आगामी निवडणुकीतील खेड तालुक्याचे राजकीय गणित चर्चेत आले आहे.

हे सुद्धा वाचा : आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणांना वेग

जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अद्याप काही  दिवसांचा कालावधी असला तरी खेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींची जुळवाजुळव  सुरू झाल्याचे चित्र आहे. आगामी काळात विरोधी गटाकडून कोणती भूमिका घेतली जाते, नव्या राजकीय आघाड्या आकाराला येतात का आणि सध्याच्या संख्याबळात बदल होतो का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. मोहिते पाटील समर्थकांकडून मात्र ७२ प्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या आधारे आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील पीडीसीसी निवडणुकीचे राजकीय वातावरण निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच तापू लागले आहे.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Web Title: Dilip mohite patil staged a massive show of strength in khed ahead of the pdcc bank election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Chakan News
  • PDCC Bank
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
1

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
2

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
3

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
4

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.