Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना

नदीतील सूक्ष्मजीवांच्या रचनेत होणाऱ्या बदलांमागे पाण्याची विद्युत वाहकता आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे प्रमुख रासायनिक घटक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण वाढल्यास त्याची विद्युत वाहकता वाढू शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 02:44 PM
सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना

Follow Us
Follow Us:
  • मुळा-मुठा नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीवर सांडपाणी आणि प्रदूषणाचा परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले.
  • पुणेस्थित आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासात हा निष्कर्ष आढळला.
  • नदीतील सूक्ष्म शेवाळाचा अभ्यास करताना संशोधकांना सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक रचनेत बदल झाल्याचे दिसून आले.
पुणे : शहरातील सांडपाणी आणि प्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीतील सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक रचनेत बदल होत असून, पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहानंतरही ही परिस्थिती पूर्ववत होत नसल्याचे पुणेस्थित आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. नदीतील सूक्ष्म शेवाळाचा अभ्यास करताना संशोधकांना हा निष्कर्ष आढळला, नैसर्गिक प्रवाहामुळे प्रदूषके वाहून जात असली, तरी शहरी प्रदूषणाचा प्रभाव नदीतील जैवविविधतेवर कायम राहत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

उष्णकटिबंधीय नद्यांमध्ये मोसमी पूर आल्याने प्रदूषके वाहून जातात आणि सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचे नैसर्गिक मिश्रण पुन्हा प्रस्थापित होते, असे यापूर्वीच्या संशोधनांतून दिसून आले होते. मुळा-मुठा नदीच्या बाबतीत पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहाचा परिणाम मर्यादित असल्याचे या अभ्यासातून दिसून आले. पूरस्थितीमुळे नदीतील सूक्ष्मजीवांच्या रचनेत काही काळासाठी बदल होत असले, तरी प्रदूषणाची पातळी कोणत्या प्रजाती टिकून राहतील, हे ठरवते. संशोधक प्रत्याशा नायक आणि डॉ. बालासुब्रमनियन कार्थिक यांनी २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत नदीच्या उगमक्षेत्रापासून शहरी आणि औद्योगिक भागापर्यंत १७ ठिकाणांहून पाण्याचे तसेच
दगडांवर साचलेल्या जैविक थराचे नमुने गोळा केले. या नमुन्यांच्या आधारे त्यांनी डायटम्स या एकपेशीय सूक्ष्म शेवाळांचा अभ्यास केला.

डायटम्सच्या पेशीभोवती सिलिकाचे कवच असते. पर्यावरणातील बदलांना हे सूक्ष्मजीव संवेदनशील असल्याने पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे नदीतील प्रदूषणाचा परिसंस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी डायटम्सचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

स्थानिक प्रजातींची जागा प्रदूषणसहिष्णूंनी घेतली

संशोधनात नदीतील एखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या डायटम्सच्या प्रजातींची एकूण विविधता वेगवेगळ्या ऋतूमध्ये तुलनेने स्थिर असल्याचे आढळले. मात्र, नदीचा प्रवाह उगमक्षेत्राकडून शहरी भागाकडे जाताना प्रजातींच्या रचनेत मोठे बदल झाले. स्वच्छ आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असलेल्या उगमाच्या परिसरात पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती आढळल्या. परंतु, शहरी भागात सांडपाणी आणि पोषकद्रव्यांचे प्रमाण वाढल्याने या संवेदनशील स्थानिक प्रजातींचे प्रमाण घटले. त्यांच्या जागी प्रदूषण सहन करू शकणाऱ्या प्रजातींचे प्रमाण वाढल्याचे संशोधकांना दिसून आले.

पाण्याच्या रासायनिक गुणधर्मांचाही परिणाम

नदीतील सूक्ष्मजीवांच्या रचनेत होणाऱ्या बदलांमागे पाण्याची विद्युत वाहकता आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे प्रमुख रासायनिक घटक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण वाढल्यास त्याची विद्युत वाहकता वाढू शकते. तसेच, सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण प्रभावित होते. परिणामी, पर्यावरणातील बदलांना संवेदनशील असलेल्या स्थानिक प्रजातीच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो.

पाण्याच्या गुणवत्तेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी महत्त्वाची

नदीचे संवर्धन करण्यासाठी केवळ नैसर्गिक प्रवाह कायम ठेवणे पुरेसे नसून, शहरी सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करणे आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच, पाण्याच्या गुणवत्तेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे आहे.

FAQ

1. मुळा-मुठा नदीत कोणता बदल झाला आहे?
सांडपाणी आणि शहरी प्रदूषणामुळे नदीतील सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक रचनेत बदल झाला आहे.

2. हा निष्कर्ष कोणत्या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला?
पुणेस्थित आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला.

3. संशोधकांनी कशाचा अभ्यास केला?
संशोधकांनी नदीतील सूक्ष्म शेवाळाचा अभ्यास केला.

Web Title: Sewage has altered the microbial ecosystem of the mula mutha rivers nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
1

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन 3’ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार
2

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन 3’ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार

Pune MLC Election Result: ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटले; पुणे पदवीधर मतमोजणी केंद्रावर हर्षदा देशमुख आक्रमक
3

Pune MLC Election Result: ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटले; पुणे पदवीधर मतमोजणी केंद्रावर हर्षदा देशमुख आक्रमक

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष
4

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.