
Pune News, MLC Elections, Election Results, Harshada Deshmukh
अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच काहीकाळ गोंधळ निर्माण झाल्याचे आढळून आले. आठ मतपेट्यांना सील नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आक्षेप घेतला. यावरून निवडणूक अधिकारी आणि मतदार प्रतिनिधीमध्ये बराच वेळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. या गोंधळामुळे काहीवेळ मतमोजणी प्रक्रिया थांबवावी लागली.
जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, ‘…असे कृत्य राक्षसच करू शकतो’
महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचे आढळून आल्याचा आरोप केला. त्यामुळे आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारावर महाविकास आघाडीसह विविध उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. यानंतर सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेवून उर्वरित मतपेट्यांची मतमोजणी केली जावी, अशी मागणी प्रतिनिधींनी केली.
महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीदरम्यान काही मतपेट्यांवरील सील तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मतपेट्यांवरील कागदी सील शाबूत असल्याचे सांगत मतमोजणी सुरू ठेवण्यास सांगण्यात आल्याचा आरोप प्रतिनिधींनी केला.
या प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याचेही प्रतिनिधींनी सांगितले. मात्र, त्यांना अद्याप रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची तक्रार त्यांनी केली. निवडणूक निरीक्षकांसमोर आक्षेप नोंदवूनही त्याची लेखी नोंद घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra MLC Election Result News: विधान परिषदेच्या ५ मतदारसंघांसाठी मतमोजणीला प्रारंभ
सील तुटलेल्या मतपेट्यांमध्ये कोणत्या उमेदवाराला मतदान झाले आहे, याची माहिती नसल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले. हा प्रकार कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नसून सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींनी याबाबत आक्षेप घेतल्याचा दावा त्यांनी केला.
मतमोजणी पूर्णपणे थांबवण्याची मागणी नसून, सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेवाव्यात आणि उर्वरित मतपेट्यांची मतमोजणी पारदर्शक पद्धतीने सुरू ठेवावी, अशी भूमिका प्रतिनिधींनी मांडली. या प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Ans: महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटल्याचा आरोप करत आक्षेप घेतल्यामुळे काही काळ मतमोजणी थांबवावी लागली होती.
Ans: सील तुटलेल्या किंवा संशयित मतपेट्या बाजूला ठेवून, ज्या मतपेट्यांचे सील पूर्णपणे सुरक्षित आहेत त्यांचीच मोजणी आधी करावी, अशी मागणी करण्यात आली.
Ans: प्रतिनिधींना आत पेन आणि कागद घेऊन जाण्यास पोलिसांनी अटकाव केल्याने प्रभाकर देशमुख आणि पोलिसांमध्ये वाद झाला.