Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष

खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये २३ ऑक्टोबरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण २४.५१ टीएमसी म्हणजेच ८४.०८ टक्के पाणीसाठा होता. मात्र, समाधानकारक साठा म्हणजे आगामी वर्षभर पाण्याची चिता संपली, असे मानता येणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 12:06 PM
पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष 
  • आगामी रब्बी हंगामातील पाणी नियोजनाबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता.
  • कालव्यांमधून पाणी सोडण्याचे वेळापत्रक आणि आवर्तन याबाबत चर्चा अपेक्षित.
पुणे : धरणांतील पाणीसाठा समाधानकारक असला, तरी आगामी महिन्यांत पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीच्या सिंचनाचे नियोजन कसे साधायचे, हा प्रश्न पुणे जिल्ह्यासमोर उभा आहे. संभाव्य पाणीटंचाईची चाहूल आणि रब्बी हंगामातील सिंचनाची गरज लक्षात घेता, जिल्ह्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक नेमकी कधी होणार, याकडे शेतकरी आणि शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ऑक्टोबरअखेरीस बैठक होण्याची शक्यता असली, तरी अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे पाणीवाटपाचे नियोजन आणि आगामी आवर्तनांचे वेळापत्रक याबाबतची अनिश्चितता कायम आहे.

पिण्याचे पाणी आधी, शेतीचे नियोजन कसे ?

पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांची पाण्याची गरज लक्षात घेता, उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. शहरातील पाणीपुरवठ्यावर कपातीचे निर्बंध लागू असताना शेतीसाठी कालव्यांमधून आवर्तने सुरू ठेवण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शेतीसाठी किती पाणी उपलब्ध होणार, आवर्तनांचा कालावधी किती असेल आणि पाणीकपातीचे धोरण कसे राबवले जाणार, या प्रश्नांची उत्तरे समितीच्या बैठकीतून अपेक्षित आहेत.

२४.५१ टीएमसी पाणीसाठा; तरी नियोजन महत्त्वाचे

खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये २३ ऑक्टोबरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण २४.५१ टीएमसी म्हणजेच ८४.०८ टक्के पाणीसाठा होता. मात्र, समाधानकारक साठा म्हणजे आगामी वर्षभर पाण्याची चिता संपली, असे मानता येणार नाही. शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट गावांची गरज, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची मागणी आणि रब्बी हंगामातील सिंचन यांचा एकत्रित विचार करून पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

हवेली, दौंड, इंदापूरच्या शेतकऱ्यांचे लक्ष

खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हवेली, दौंड आणि इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी आवर्तनांचे वेळापत्रक महत्त्वाचे आहे. पाणी कधी मिळणार, किती दिवस मिळणार आणि उपलब्ध पाण्यात कोणत्या पिकांना प्राधान्य द्यायचे, यावर शेतीचे नियोजन अवलंबून असते. आवर्तनांबाबत अनिश्चितता राहिल्यास पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत केवळ पाणीवाटपाचे प्रमाण निश्चित न करता कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्याची व्यवस्था आणि पाणीगळती रोखण्याच्या उपाययोजनांवरही भर देणे आवश्यक आहे.

बैठकीची तारीख जाहीर करण्याची अपेक्षा

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घरणांतील उपलब्ध साठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, शेतीसाठी उपलब्ध पाणी आणि आवर्तनाचे संभाव्य वेळापत्रक यावर स्पष्ट निर्णय होणे अपेक्षित आहे. पाणीटंचाईचे संकट तीव्र झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, उपलब्ध साठ्याचा आढावा घेऊन आधीच नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे बैठकीची निश्चित तारीख जाहीर करून पाणीवाटपाचे वेळापत्रक स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

FAQ

1. पुणे जिल्ह्यातील कोणत्या बैठकीची प्रतीक्षा आहे?
पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे.

2. कालवा समितीच्या बैठकीकडे कोणाचे लक्ष लागले आहे?
शेतकरी आणि नागरिकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

3. बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे?
शेतीसाठी कालव्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन आणि आवर्तनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Awaiting the pune district canal committee meeting nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • pune news
  • Water Issue

संबंधित बातम्या

Pune MLC Election Result 2026: पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी; काँग्रेसचे जयंत आसगावकरांचा पराभव
1

Pune MLC Election Result 2026: पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी; काँग्रेसचे जयंत आसगावकरांचा पराभव

Pune News: पुणेकरांनो, मुळा-मुठा नदीबाबत धक्कादायक खुलासा! पावसाळ्यातही प्रदूषणाचा विळखा कायम
2

Pune News: पुणेकरांनो, मुळा-मुठा नदीबाबत धक्कादायक खुलासा! पावसाळ्यातही प्रदूषणाचा विळखा कायम

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद
3

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले
4

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.