
हिंजवडी ते शिवाजीनगर 'मेट्रो लाईन 3'ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार असून, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. याच कार्यक्रमात महा मेट्रोच्या उर्वरित/विस्तारित टप्प्यांचाही लोकार्पण वा भूमिपूजनाचा कार्यक्रम समाविष्ट करून पुणेकरांना एकाच वेळी दुहेरी मेट्रो भेट देण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर सुरू आहे.
शंभर दिवसांची प्रतीक्षा संपली
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर मार्गावरील १७ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन रीतसर परवानगी मिळाली होती. मात्र, औपचारिक उद्घाटनाच्या मुहूर्ताअभावी ही मेट्रो तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ प्रवाशांविनाच ट्रॅकवर रिकामी धावत होती. ३ नोव्हेंबर रोजी बालेवाडी स्टेडियम येथे भव्य शासकीय कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ऑनलाइन उपस्थितीसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.
1. हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होण्याची शक्यता आहे?
हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचे ३ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.
2. मेट्रो कोणत्या मार्गावर धावणार आहे?
मेट्रो लाईन ३ ही हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणार आहे.
3. या मार्गावर चाचण्या सुरू आहेत का?
होय. गेल्या शंभरहून अधिक दिवसांपासून या मार्गावर मेट्रोच्या ट्रायल रन सुरू आहेत.