पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एका वाहनांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांनी गाडीचालकाची चौकशी करून त्याला सोडून दिले आणि रोख रक्कम जप्त केली. तर ही रक्कम ज्या वाहनातून जप्त करण्यात आली, त्या वाहनमालकाचे नाव अमोल नलावडे आहे.पण ही रक्कम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊतांच्या या आरोपावर शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप फेटाळून लावत राऊतांवरच निशाणा साधला आहे. ” राज्यातील ठाकरे सरकार कोसळ्यापासून संजय राऊतांना शहाजी बापू पाटीलच दिसत आहेत. पण खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडलेल्य पैशांशी किंवा त्या कार्यकर्त्यांशी माझा काहीही संबंध नाही. संगलो मतदारंसघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचले जात आहे. असा पलटवार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा: खेड-शिवापूर टोलनाक्यावर मिळालेली पाच कोटींची रक्कम कुणाची? संजय राऊतांचा गंभीर आरोप
खेड शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम पोलीस चौकीत नेण्यात आली. निवडणूक निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनाही कारवाईसाठी बोलवण्यात आले. पण यानंतर मात्री या कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर शिंदे गटावर आरोप केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जवळपास 776 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर 31 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या माध्यमातून बेकायदा पैसे, ड्रग्ज आणि इतर मौल्यवान वस्तूंह जवळपास 31 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त कऱण्यात आली आहे.
हेही वाचा: राज ठाकरेंना महायुतीकडून काहीतरी मिळणार?; बिनशर्त पाठिंब्याची परतफेड होण्याची शक्यता