Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2026 | 12:30 AM
पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत मध्य रेल्वेने काही त्रुटी काढल्या आहेत. हा प्रस्ताव पुन्हा रेल्वे बोर्डाकडे आला आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने त्रुटी तात्काळ दूर कराव्यात. परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे केली. खासदार बारणे यांनी रेल्वे बोर्डाचे निदेशक फखरुद्दीन अली अहमद यांची भेट घेतली. त्यांना याबाबतचे सविस्तर निवेदन दिले.

 

सध्या पुणे-लोणावळा लोकलच्या दिवसभरात ६०.५९ किलोमीटर अंतर कापत दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत ४४ फेऱ्या होतात. या मार्गावर असणारा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा ताण लक्षात घेता उपनगरीय सेवेसाठी स्वतंत्र मार्गाची अनेक वर्षांपासून खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मागणी केली जात होती. त्यानुसार त्यांचा केंद्र, राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्याच प्रयत्नातून या मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी २०१७ मध्ये मान्यता मिळाली आहे.

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या या प्रकल्पाचा एकूण खर्च पाच हजार १०० कोटी रुपये आहे. त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील ५०.५० टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्र सरकार व राज्य शासन उचलणार आहे. राज्य शासनाचा एकूण वाटा दोन हजार ५५० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

खासदार बारणे म्हणाले, पुणे-लोणावळा तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकला मान्यता मिळाली आहे. मध्य रेल्वेने त्यात काही त्रुटी काढल्या आहेत. प्रस्ताव पुन्हा रेल्वे बोर्डाकडे आला आहे. रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव निती आयोगाकडे जाईल. त्यानंतर केंद्राकडून मान्यता मिळेल. त्यामुळे रेल्वे बोर्डाने तातडीने त्रुटींची दुरुस्ती करावी. परिपूर्ण प्रस्ताव तातडीने द्यावा. हा प्रस्ताव निधीसाठी निती आयोगाकडे जाईल. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता मिळेल. त्यानंतर कामाला प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला चार ते पाच महिन्यांचा कालावधी जाईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला गती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी निधीची तरतूद करुन ठेवली आहे.

Web Title: Shiv sena mp shrirang barne has made a major demand to the railway board directors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • PM Narendra Modi
  • Shrirang Barne

संबंधित बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
1

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?
2

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित
3

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
4

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.