लाठ्या, लाथाबुक्क्या, छातीवर नाचले; संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर
पुणे: बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या वाल्मिक कराडला पुण्यात आश्रय देणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या शिष्टमंडळाने विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांना निवेदन दिले.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणाने चर्चेत आलेले वाल्मिक कराड तसेच खंडणीच्या गुन्ह्यात २२ दिवस पसार राहत मंगळवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीआयडी ) पुणे कार्यालयात स्वत: हजर झाला.
बीडमधील केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. नंतर तो अनेक दिवस पुण्यातच वास्तव्याला राहिल्याचेही समोर आले होते. सीआयडी तसेच बीड पोलीस शोध घेऊन ही न सापडणारा वाल्मिक कराड मात्र, बीडमधील नगरसेवकांसोबत थेट सीआयडीच्या मुख्यलयात हजर झाला. त्याच्या परळीतील कार्यकर्त्यांना देखील तो हजर होणार असल्याची माहिती असताना तसेच ते त्यासाठी पुण्यात आले असताना देखील पोलीस यंत्रणेला हे समजू शकले नाही. त्यावरून आता उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता पसार काळात कराडला आश्रय देणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, असे निवेदनात म्हटले आहे.
त्याला पुण्यात वास्तव्य करण्यासाठी कोणी मदत केली ? याची सखोल चौकशी व्हावी, तसेच आश्रय देणाऱ्यांना सहआरोपी करावे. पुणे शहरातील किती समर्थक त्याच्या संपर्कात होते, याची चौकशी होणे गरजेचे आहे. पुणे शहर हे गुन्हेगारांना वास्तव्यासाठी सुरक्षित का वाटत आहे ? असे शहरप्रमुख संजय मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात उपशहर प्रमुख आबा निकम, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेना समन्वयक युवराज पारीख, संघटक अजय परदेशी उपस्थित होते.
हेही वाचा:
22 दिवसांनी शरण आलेल्या वाल्मीकचा ‘या’ तीन राज्यांमध्ये मोठा प्रवास
तब्बल 22 दिवसानंतर वाल्मीक कराड हा शरण आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मीक कराड शरण आला मात्र 22 दिवस तो कुठे होता. पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तो नक्की कुठे होता याबद्दल काही माहिती समोर आली आहे.
सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला होता असे सांगितले जात आहे. सीआयडीसमोर येण्याआधी तो उज्जैनमध्ये गेला. त्यानंतर तो कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला असे समोर येत आहे. मग तो पुण्यात आला. या तीनही राज्यात स्वतःच्या कारने तो फिरला असे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर तो काल पुण्यात स्वतःच्या गाडीतून सीआयडी ऑफिसमध्ये गेला आणि शरण आला. आता संतोष देशमुख प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. त्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मात्र वाल्मीक कराड हा शरण आल्याने त्याची संपत्ती जप्त करूनये अशी मागणी वाल्मीक कराडचे वकील कोर्टसमोर करण्याची शक्यता आहे.