Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी सुलभा उबाळे यांचे पुत्र अजिंक्य उबाळे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2025 | 02:42 PM
ठाकरे गटाला धक्का ! 'या' फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला धक्का ! 'या' फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसऱ्यांदा ‘लॉटरी’ लागली आहे. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील फायरब्रँड महिला नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी सुलभा उबाळे यांचे पुत्र अजिंक्य उबाळे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुलभा उबाळे यांच्यासोबत भोसरी विधानसभा महिला आघाडी समन्वयक सुजाता काटे, शिवसेना संघटक संतोष सौंदाणकर व युवासेनेचे भोसरी विधानसभा शहरप्रमुख अजिंक्य उबाळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सुलभा उबाळे यांची महिला आघाडी उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

शहरात ठाकरे गटाचे अस्तित्वच नाही

विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात ठाकरे गटाचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुलभा उबाळे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाची वाढली ताकद

सुलभा उबाळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

अनेक महिला पदाधिऱ्यांचाही प्रवेश

पक्षप्रवेश यावेळी सुलभा उबाळे यांच्यासह उपशहर संघटिका शशिकला उभे, विभाग संघटिका भारती चकवे, शाखाप्रमुख कावेरी परदेशी, उपशाखाप्रमुख निर्मला पाटील, प्रिया जपे, नयना पारखे, उपशाखा संघटिका लीलावती देवकाते, दिपा जागते, गटप्रमुख स्मिता मोगरे, लीना नेहते, मंदा पाटील तसेच पुणे महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. तर उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, उपविभागप्रमुख गणेश झिळे, विभाग संघटक राजेंद्र पालांडे, उपविभागप्रमुख कौस्तुभ गोळे, शाखाप्रमुख महेश डोके, विजय घुले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील याप्रसंगी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

Web Title: Sulabha ubale joins eknath shinde shiv sena party nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.