पुण्यात स्वारगेट बसस्थानकात अत्याचार झालेल्या पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट आला समोर
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी फरार असून पोलिसांची ८ पथकं त्याच्या मागावर आहेत. दरम्यान पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला असून पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या मेडिकल रिपोर्टकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यातील स्वारगेटमधील डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. अत्याचाराची घटना घडल्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर काही वेळेनंतर मेडिकल रिपोर्टसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर आता पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे.
मेडिकल रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला आहे. ससून रुग्णालयाने पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे. मेडिक रिपोर्टमधून अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहे. पोलिसांना तपासात मेडिकल रिपोर्टची मदत होणार आहे. या मेडिकल रिपोर्टमुळे कोण-कोणते खुलासे होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यात आता महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राज्यभारात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान तरुणीवर अत्याचाराच्या घटनेची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे.सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे.ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून,तिला खोटं सांगून बस मध्ये नेलं आणि अत्याचार केला.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे.सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे.ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून,तिला खोटं सांगून बस मध्ये नेलं आणि अत्याचार केला.
ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे तर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.शासकीय यंत्रणा,चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता.मात्र दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला.