Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ शिक्षकांचा “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम वनाज परिवार विद्यामंदिर, वनाज कॉर्नर, कोथरूड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2026 | 04:02 PM
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; 'आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; 'आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' सोहळा उत्साहात संपन्न

Follow Us
Follow Us:

पुणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ पुणे सिनिअर्स आणि इंडियन नॅचरल हनीबीज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ शिक्षकांचा “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम वनाज परिवार विद्यामंदिर, वनाज कॉर्नर, कोथरूड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ला. श्याम भुर्के होते. प्रमुख पाहुणे एम.जे.एफ. ला. सतीश राजहंस आणि ला. नितीन थोपटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करून आयोजकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी इंडियन नॅचरल हनीबीज, पुणे यांच्या वतीने “मधमाशी वाचवा, पर्यावरण वाचवा” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मधमाशी परागीभवनाद्वारे शेती, वनस्पती आणि जैवविविधतेच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावते, याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन  लायन्स क्लब ऑफ पुणे सिनिअर्स अध्यक्ष ला. नितीन पाटील आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सिनिअर्स सचिव व इंडियन नॅचरल हनीबीजचे संचालक ला. संजय मारणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम दिवटे यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मुख्याध्यापिका अनिता दारवटकर, उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांचे सहकार्य लाभले.

हे सुद्धा वाचा : गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य, आरएसएसचे पदाधिकारी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. डॉ. संजय राजाराम नायडू  (बालाजी माध्यमिक विद्यालय,धनकवडी) अमृता यशवंत  साळुंके (पुणे महानगरपालिका शाळा  क्रमांक 153 मुलांची, बावधन खुर्द, पुणे.) रणजित सुदामराव बोत्रे (गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर गोखलेनगर पुणे.) अनिता सूर्यकांत दारवटकर (वनाज परिवार विद्यामंदिर,कोथरूड)  प्रा. अशोक सोपान ढोले (सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सेनापती बापट रोड, पुणे.) प्रदीप हरिभाऊ वीर (माध्यमिक विद्यालय, कांबरे खेबा ता. भोर जि. पुणे.) विद्या प्रविण सोनवणे (पुणे मनपा शाळा क्रमांक ९४ जी कात्रज) रूपाली राजेंद्र जाधव (एच. ए. स्कूल, प्राथमिक विभाग, पिंपरी पुणे.) प्रतिभा सूर्यकांत जगताप (रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारगाव सालू-मालू तालुका दौंड जिल्हा पुणे.) दिपक सुदाम पिसे  (भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे.) सुवर्णा गोडबोले (सेवानिवृत्त,एस.पी.एम. इंग्लिश स्कूल, पुणे) रेखा रघुनंदन जाधव (सेवानिवृत्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) आदी शिक्षक आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले.

Web Title: Teachers who have made remarkable contributions to the field of education have been felicitated in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • pune news
  • Teacher
  • Teachers

संबंधित बातम्या

Non-Teaching Staff Recruitment: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर; ८० टक्के पदे सरळसेवेने भरणार!
1

Non-Teaching Staff Recruitment: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर; ८० टक्के पदे सरळसेवेने भरणार!

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
2

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
3

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
4

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.