Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव नगरपंचायतीचा 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाणीपुरवठा, रस्ते, अन्…

वडगाव नगरपंचायतीचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभागृहात सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर मांडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 01:36 PM
वडगाव नगरपंचायतीचा 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाणीपुरवठा, रस्ते, अन्...

वडगाव नगरपंचायतीचा 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाणीपुरवठा, रस्ते, अन्...

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभागृहात सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर मांडला. सविस्तर चर्चेनंतर सर्व सदस्यांनी या अर्थसंकल्पास एकमताने मंजुरी दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प एकूण १२१ कोटी ५३ लाख ७७ हजार ५४८ रुपये इतका असून, “सुशासन, स्वच्छता व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल” हे या वर्षाचे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

 

आर्थिक आढावा : जमा व खर्च

एकूण जमा : १२१. ५३ कोटी रुपये (यात प्रारंभीची शिल्लक १९. ८४ कोटी रुपये, महसुली जमा २५.६३ कोटी रुपये व भांडवली जमा ७६.०५ कोटी रुपयांचा समावेश आहे).

एकूण खर्च : महसुली खर्च २८.०४ कोटी रुपये, तर भांडवली विकासकामांसाठी ९३.४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अखेरची शिल्लक : ३.२५ लाख रुपये अपेक्षित.

विकासकामांवर भरीव तरतूद

अर्थसंकल्पात शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी २० कोटी रुपये, जलवाहिनी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ५.०८ कोटी रुपये, नवीन रस्ते व दुरुस्तीसाठी २७.७० कोटी रुपये, प्रशासकीय इमारतीसाठी २.९२ कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनासाठी २.६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छता व माझी वसुंधरा अभियानासाठी ४.७० कोटी, ड्रेनेज नेटवर्कसाठी १ कोटी, विद्युत व्यवस्थेसाठी १.९६ कोटी, अग्निसुरक्षा योजनेसाठी २ कोटी, जमीन संपादनासाठी ५.६० कोटी, सांडपाणी प्रकल्प डीपीआरसाठी १.५१ कोटी, मल्टीपर्पज हॉल व गाळ्यांसाठी ३ कोटी, नमो उद्यानासाठी १ कोटी, महिला आरोग्य व शैक्षणिक सुविधांसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २५ लाख, उद्याने व बगीच्यांसाठी ४५ लाख तर ई-चार्जिंग स्टेशनसाठी २० लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

पाणीपुरवठा आणि मलनिसारणावर लक्ष

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर असलेली ३९. ३३ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना जलदगतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ५.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ‘स्टॉर्म वॉटर ड्रेनेज’ व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वच्छता, हरित ऊर्जा व नागरी सुविधा

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत घनकचरा प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी, तलाव-नाले-विहिरींचे संवर्धन, प्रत्येक प्रभागात उद्याने, नमो उद्यान, हरित पट्टे व ग्रे-वॉटर व्यवस्थापन राबविण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन व सौरऊर्जा प्रकल्प उभारणी, पार्किंग धोरण, फेरीवाला धोरण तसेच महिला स्वसंरक्षण, योग व आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन आहे.

गरजू नागरिकांसाठी रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देण्याची योजना राबविण्यात येणार असून ७.५ कोटी रुपयांचे शॉपिंग सेंटर उभारण्याचाही प्रस्ताव आहे.

प्रशासनाचा विश्वास

नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व हरित उपक्रमांना प्राधान्य दिल्याचे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी उत्पन्नाचे स्रोत, निधी नियोजन व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा सभागृहासमोर मांडला. यावेळी उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, अजय म्हाळसकर, गटनेते दिनेश ढोरे, गणेश म्हाळसकर, माया चव्हाण, सुनिता ढोरे, पुनम भोसले, रोहित धडवले, रुपाली ढोरे, विशाल वहिले, अजय भवार, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, वैशाली सोनवणे, अनंता कुडे, राणी म्हाळसकर, संदीप म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे आदी नगरसेवक उपस्थित होते. तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व सदस्यांच्या चर्चेनंतर मांडलेल्या तरतुदी व शिफारशींसह अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, शहराचा नियोजनबद्ध, पारदर्शक व सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Web Title: The budget of vadgaon nagar panchayat has been presented in the nagar panchayat hall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Budget
  • nagarpanchayat
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल
1

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

राजगुरुनगर नगरपरिषदेचा विकासाकडे कल; करवाढीशिवाय 122.80 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
2

राजगुरुनगर नगरपरिषदेचा विकासाकडे कल; करवाढीशिवाय 122.80 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर; ‘या’ कामांसाठी विशेष तरतूद
3

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर; ‘या’ कामांसाठी विशेष तरतूद

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स
4

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.