Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनांवरील प्रशासकीय सेवेमधील काही हुद्द्यांची मानीव दिनांकापासून पदोन्नती करण्याची प्रस्तावित प्रक्रिया रद्द करून सर्व संबंधित सेवकांची नव्याने सखोल तपासणी व पडताळणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2026 | 01:32 PM
मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा...; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा...; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Follow Us
Follow Us:
  • मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा
  • प्रशासकीय सेवकांना समान न्याय देण्याची मागणी
  • मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनांवरील प्रशासकीय सेवेमधील काही हुद्द्यांची मानीव दिनांकापासून पदोन्नती करण्याची प्रस्तावित प्रक्रिया रद्द करून सर्व संबंधित सेवकांची नव्याने सखोल तपासणी व पडताळणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), उपआयुक्त, आस्थापना विभाग तसेच महापौर यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

पुणे महापालिकेच्या आस्थापनांवरील प्रशासकीय सेवेमधील काही हुद्द्यांची मानीव दिनांकापासून पदोन्नती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रस्तावित यादीमध्ये अनेक सेवकांचा समावेश करण्यात आलेला नसून, त्यामुळे उर्वरित सेवकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही सेवकांना यापूर्वीही मानीव दिनांकाचा लाभ घेऊन पदोन्नती मिळालेली असताना, त्याच हुद्द्यावरील इतर सेवकांना अद्याप हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करून सर्व सेवकांना समान न्याय व पदोन्नतीचा लाभ मिळावा, अशी मागणी सुहास निम्हण यांनी निवेदनातून केली आहे.

हे सुद्धा वाचा : महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

प्रस्तावित पदोन्नती प्रक्रियेमध्ये सध्या कार्यरत असणारे प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक तसेच प्रशासकीय सेवेमधील इतर सर्व संबंधित सेवकांचा समावेश करावा. सर्वांची मानीव दिनांकापासून नव्याने तपासणी व पडताळणी करून त्यानुसार पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. सध्या सुरू असलेली प्रस्तावित पदोन्नती प्रक्रिया रद्द करून सर्व संबंधित सेवकांची एकत्रितपणे नव्याने पदोन्नती प्रक्रिया राबवावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मानीव दिनांकापासून करण्यात येणारी पदोन्नतीची प्रस्तावित प्रक्रिया येत्या आठ दिवसांत रद्द न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुहास निम्हण यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण, संजय तोडमल यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

Web Title: The mns has submitted a memorandum to the pune municipal corporation administration making a major demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • MNS
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pune: ऐन दिवाळीत पुण्याचा श्वास कोंडला! फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या हवेच्या प्रदूषणाचा AQI थेट…
1

Pune: ऐन दिवाळीत पुण्याचा श्वास कोंडला! फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या हवेच्या प्रदूषणाचा AQI थेट…

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
2

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री
3

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू
4

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.