Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्त तसेच पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवदनातून प्रशासनाला इशाराही दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2026 | 11:40 AM
सौजन्य - नवराष्ट्र टीम

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us
Follow Us:
  • सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक
  • पुणे महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
  • प्रशासनाला दिला गंभीर इशारा
पुणे : सातारा रस्त्यावरील दुग्गड चौक परिसरात मुख्य हायवेलगत बिबवेवाडीच्या दिशेने जाणारा स्वामी विवेकानंद मार्ग सुरू होतो. या ठिकाणी विविध केबल्स टाकण्यासाठी तसेच इतर कामांसाठी महापालिकेच्या परवानगीने रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. मात्र, खोदाईनंतर रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नसून, गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी दगड, मुरूम, माती व काँक्रीटचे तुकडे पडून असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या संदर्भात मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्त तसेच पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

सातारा रस्ता हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून परिसरात शाळा, क्लासेस, आयटी कंपन्या तसेच विविध शासकीय कार्यालये आहेत. पुढे हा मार्ग सातारा तसेच मुंबई महामार्गाला जोडला जात असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच सध्या पावसाळा सुरू असल्याने खोदलेल्या भागातील माती व चिखल रस्त्यावर पसरत असून, खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.

संबंधित ठिकाणचा खड्डा तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच खोदाईनंतर पडून असलेला राडारोडा तात्काळ हटवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी भविष्यात अपघात अथवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशारा मनसेने दिला आहे.यावेळी मनसेचे ऍंथोनी आढाव, महेश भोईबार, संतोष चव्हाण, आशिष साबळे, रोहन नडीमेटला, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा  : दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

Web Title: The mns has taken an aggressive stance regarding the potholes at duggad chowk on satara road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • MNS
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
1

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
4

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.