Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शास्त्रीनगर, विश्रांतवाडीत लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

शास्त्रीनगर आणि विश्रांतवाडी येथील  ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्पाची कामे मुदतीत पुर्ण करा असे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2026 | 01:13 PM
शास्त्रीनगर, विश्रांतवाडीत लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

शास्त्रीनगर, विश्रांतवाडीत लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : शास्त्रीनगर आणि विश्रांतवाडी येथील  ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्पाची कामे मुदतीत पुर्ण करा असे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी दिले आहेत. शास्त्रीनगर येथील काम मार्च २०२७ अखेर तर विश्रांतवाडी येथील काम यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शास्त्रीनगर चौक येथील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल प्रकल्प, विश्रांतवाडी ( मुकुंदराव आंबेडकर चौक – विश्रांतवाडी जंक्शन) येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या कामाचा आयुक्तांनी गुरुवारी आढावा घेतला. या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्पांच्या कामास गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारास दिल्या.

आगाखान पॅलेस ते गुंजन चौक रस्ता

सध्या नगर रोडवरून येणारी वाहतूक गोल्फ चौकमार्गे मुंबईच्या दिशेने तसेच कल्याणीनगर व गुंजन चौकाच्या दिशेने जाते. या मार्गांवरील वाहतुकीचा मोठा भार शास्त्रीनगर चौक परिसरात येत असल्याने चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने सुमारे ७५० मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे. तसेच आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या दिशेने सुमारे ७०० मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल प्रस्तावित असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे शास्त्रीनगर चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा  : पुण्यात फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला; पोलिसांची अटी, शर्तीसह ‘ना हरकत’

विश्रांतवाडीतील अडचण एका महिन्यात दूर होणार

विश्रांतवाडी येथील  मुकुंदराव आंबेडकर चौक  येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामाच्या पाहणीदरम्यान आळंदी रस्ता ते विमानतळ रस्ता या दिशेतील ग्रेड सेपरेटरच्या कामामध्ये श्री रामेश्वरशेठ गणपती मंदिराचा काही भाग तसेच श्री महालक्ष्मी देवी मंदिरामुळे निर्माण होणारा अडथळा आयुक्तांना जागेवर समजावून सांगण्यात आला. सदर अडथळ्यामुळे ग्रेड सेपरेटरचे काम नियोजित गतीने पुढे नेण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. हा विषय एका महिन्यात निकाली काढण्याच्या सुचनाही आयुक्तांनी दिल्या. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,पुणे व पिंपरी चिंचवड (एसआरए), बांधकाम विकास विभाग ,नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण विभाग तसेच संबंधित जागामालक यांची संयुक्त बैठक व संयुक्त जागा पाहणी आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात चौकातील वाहतूक वळविल्यानंतर चौक व आळंदी रस्ता बाजूकडील उड्डाणपुलाचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारास देण्यात आल्या.

Web Title: The pune municipal commissioner reviewed the projects in the shastri nagar and vishrantwadi areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

‘परिवर्तनासाठी सक्षम युवाशक्ती आवश्यक’; माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं विधान
1

‘परिवर्तनासाठी सक्षम युवाशक्ती आवश्यक’; माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं विधान

पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार
2

पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार

पुण्यात फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला; पोलिसांची अटी, शर्तीसह ‘ना हरकत’
3

पुण्यात फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला; पोलिसांची अटी, शर्तीसह ‘ना हरकत’

Maharashtra Breaking News Live Updates Today: नाशिकला ३.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: नाशिकला ३.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.