Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

मोहम्मदवाडी परिसरात गणपती स्थापना मिरवणुकीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक आवाजात प्लाझ्मा साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्या मंडळावर काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2026 | 02:58 PM
दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजेवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली असून, मोहम्मदवाडी परिसरात गणपती स्थापना मिरवणुकीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक आवाजात प्लाझ्मा साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्या मंडळावर काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टीमसह ती वाहून नेणारा टाटा ७०९ ट्रक असा तब्बल १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोहम्मदवाडीतील शंभू कॉलनी येथील शेल पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली आहे. गणपती स्थापना मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर काळेपडळ पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तांत्रिक तज्ज्ञाच्या मदतीने साऊंड सिस्टीमची तपासणी केली. यावेळी अधिक क्षमतेच्या प्लाझ्मा साऊंड सिस्टीमचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ डीजे साऊंड सिस्टीम व ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रक ताब्यात घेतला.

पोलिसांनी जप्त केलेल्या टाटा ७०९ ट्रकची किंमत सुमारे सात लाख रुपये, तर साऊंड सिस्टीमची किंमतही सुमारे ७ लाख रुपये आहे. जप्त केलेल्या साऊंड सिस्टीममध्ये दोन बेस, दोन टॉप, मिक्स मशीन तसेच प्लाझ्मा सिस्टीमचा समावेश आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

कारवाई सुरू राहणार 

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

साऊंड व्यावसायिकांचा मूक मोर्चा

साऊंड, डीजे व संबंधित व्यावसायिकांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साऊंड व्यावसायिकांनी बुधवारी (दि. १६) पुण्यात मूक मोर्चा काढला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पुणे स्टेशन येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. साऊंड सिस्टीम, लाईट, मंडप, जनरेटर, डीजे, इव्हेंट आणि संबंधित व्यवसायातील व्यावसायिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी १२ ते ३ या वेळेत झालेल्या या आंदोलनातून शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्यात आले. साऊंड व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करून तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत व्यवसाय करण्याची तयारी दर्शविली. मात्र, नियमांचे पालन करूनही कारवाई होणे, साऊंड सिस्टीम जप्त करणे आणि व्यवसायिकांवर कारवाई होत असल्यामुळे व्यावसायिकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले.

Web Title: The pune police have seized a loud dj system and taken action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • DJ Speaker
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
1

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’
2

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
3

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा
4

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.