Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Result : खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात मोठा आणि निर्णायक बदल स्पष्टपणे समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 05:52 PM
खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • खेड तालुक्यात सत्ता कुणाची?
  • निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट
  • आमदार बाबाजी काळे यांना मोठं यश
चाकण/अतिश मेटे : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात मोठा आणि निर्णायक बदल स्पष्टपणे समोर आला आहे. या निवडणुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार बाबाजी काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत ठरल्या होत्या. निकालानंतर मात्र तालुक्यातील सत्ता-समीकरण आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 

निकालानंतर ‘मशाल’चे वर्चस्व

खेड तालुक्यातील एकूण ८ जिल्हा परिषद गटांपैकी ५ गटांवर ‘मशाल’ चिन्हाने (शिवसेना उबाठा गट) दणदणीत विजय मिळवला आहे. तर ३ गटांवर ‘घड्याळ’ चिन्हावर (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे आमदार बाबाजी काळे यांचे तालुक्यातील राजकीय नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले असून, ‘मशाल’ चिन्हाला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळाल्याचे दिसून आले आहे.

पंचायत समिती निकाल : स्पष्ट बहुमत ‘मशाल’कडे

पंचायत समितीच्या निकालांकडे पाहता शिवसेना (उबाठा) गटाला निर्णायक बहुमत मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) गट – ९ सदस्य विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस – ६ सदस्य विजयी, शिवसेना (शिंदे गट) – 1 सदस्य विजयी. या आकडेवारीनुसार पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना (उबाठा) गट अत्यंत मजबूत स्थितीत असून, सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती

माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्त्वाच्या जागांवर यश मिळाले असले, तरी तालुक्यावर अपेक्षित वर्चस्व प्रस्थापित करण्यात पक्षाला अपयश आले आहे. विशेषतः ग्रामीण भागात ‘मशाल’ चिन्हाचा वाढता प्रभाव आणि संघटनात्मक ताकद राष्ट्रवादी काँग्रेससाठी आगामी काळात चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष

या निकालांचा राजकीय संदेश काय?

खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा जनतेने ठामपणे मान्य केले आहे. पंचायत समितीवर शिवसेना (उबाठा) गटाची सत्ता येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर ‘मशाल’ चिन्ह हे आता केवळ पक्षचिन्ह न राहता राजकीय ताकदीचे प्रतीक बनले आहे. एकूणच, खेड तालुक्यातील या निवडणुकांनी स्पष्ट संदेश दिला असून, राजकीय सत्ता-समीकरण पूर्णतः आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकले आहे. ‘मशाल’चा उजेड अधिक तेजस्वी झाला असून, येणाऱ्या काळात तालुक्याच्या राजकारणावर त्याचा प्रभाव निर्णायक ठरण्याची चिन्हे आहे.

Web Title: The results of the zilla parishad and panchayat samiti elections in khed taluka have been declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Election News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर
1

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय
2

Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल
3

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य
4

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.