Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा, ओतूरकरांच्या लढ्याला यश; ‘या’ तारखेला होणार उद्घाटन

गेल्या अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि धूळ खात पडलेल्या ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2026 | 05:52 PM
ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा, ओतूरकरांच्या लढ्याला यश; 'या' तारखेला होणार उद्घाटन

ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा, ओतूरकरांच्या लढ्याला यश; 'या' तारखेला होणार उद्घाटन

Follow Us
Follow Us:

ओतूर : गेल्या अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि धूळ खात पडलेल्या ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १ मे (महाराष्ट्र दिनी) रोजी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या अद्ययावत रुग्णालयाचे लोकार्पण होणार असल्याची घोषणा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे. या निर्णयामुळे जुन्नर तालुक्यातील उत्तर भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने अखेर वेगाने हालचाली केल्या आहेत.

 

ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून तयार होती, परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे त्याचे लोकार्पण रखडले होते. या गंभीर प्रश्नाकडे नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यातच ओतूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाने आक्रमक पवित्रा घेत उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सोनवणे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि १ मे ही तारीख निश्चित झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

बैठकीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. यात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रा. झा. डुंबरे, महादेव ओतूरकर, जिल्हा परिषद सदस्या छाया तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे, जयसिंग पोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, बाजार समिती संचालक तुषार थोरात, ज्येष्ठ नेते विनायक तांबे, अनिल तांबे, उद्योजक जालिंदर पानसरे, माजी सभापती विशाल तांबे, शिवसेनेच्या अक्षदा पानसरे, संतोष तांबे, भाजपाचे भगवान घोलप, दत्ताभाऊ डुंबरे, बाळासाहेब घुले, विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे, सचिन घोलप, ऋषी डुंबरे, रामदास तांबे, भीमसेन माळवे आणि बाळासाहेब गावडे यांचा समावेश होता. ओतूर ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन हा केवळ एका इमारतीचा प्रांभ नसून, तो स्थानिक जनतेच्या संयमाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय आहे. १ मे पासून या भागातील रुग्णांना उपचारासाठी लांब जाण्याची गरज उरणार नाही, असे आमदार सोनवणे यांनी सांगितले.

सुसज्ज ‘ट्रॉमा केअर सेंटर’ करणार

आमदार सोनवणे यांनी बैठकीत रुग्णालयाच्या नियोजित आराखड्याबद्दल माहिती दिली. सध्या हे रुग्णालय ३० खाटांचे असले तरी, भविष्यात वाढती गरज लक्षात घेऊन ती संख्या १०० खाटांपर्यंत नेली जाईल. अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी लवकरच येथे सुसज्ज ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक औषधसाठा उपलब्ध करणार

रुग्णालयात सर्पदंश प्रतिबंधक लस, वन्यप्राणी चावल्यावरील लस आणि इतर अत्यावश्यक औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल. अखंड वीज पुरवठ्यासाठी उच्च क्षमतेच्या जनरेटरची सोय करण्यात आली आहे. बैठकीला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. गोलायत, डॉ. भगवान पवार, डॉ. एम. पल्ले, डॉ. रामचंद्र हंकारे, आणि ओतूर आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते उपस्थित होते.

Web Title: The rural hospital in otur will be inaugurated by health minister prakash abitkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Hospital News
  • maharashtra
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
1

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
2

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
3

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
4

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.