Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्यासह चार हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 15, 2025 | 11:23 AM
दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल इतके कर्मचारी असणार तैनात

दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल इतके कर्मचारी असणार तैनात

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्यासह चार हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यासोबतच शहरातील वाहतूकीत देखील बदल केला असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवस हा वाहतूक बदल केला असून, शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवानिमित्त दहीहंडी फुटेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे रस्त्यांवर कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने आवश्यक वाहतूक बदल केला आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशाने काढण्यात आले आहेत.

असा असेल पोलिस बंदोबस्त..

१० पोलिस उपायुक्त
१६ सहायक पोलिस आयुक्त
८० पोलिस निरीक्षक
३५० पोलिस उपनिरीक्षक व सहाय्यक निरक्षक
३५०० पोलिस अंमलदार

असा आहे बदल

फरासखाना व विश्रामबाग वाहतुक विभाग..
शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) दुपारी ४ ते गर्दी संपेपर्यंत वाहतूक बदल

  • १) शिवाजी रोड वरून स्वारगेटला जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने / शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे.
  • २) पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच सणस पुतळा चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जावे.
  • ३) स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने -झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
  • ४) बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाईल.
  • ५) रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.
  • ६) सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.
  • ७) शिवाजी रोडवरून जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक पवळे चौक जुनी साततोटी पोलिस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल.
  • ८) गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक हि दारुवाला पूल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.
  • ९) सोन्यामारूती चौकातून मोती चौक व फडके हौद चौकाकडे वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.
    – विजयमारुती चौकातून उजवीकडे वळून पासोडा विठोबा मंदिर मोतीचौक डावीकडे वळून फडके हाऊस मार्गे इच्छितस्थळी जावे.

बंडगार्डन वाहतुक विभाग…

१) तीन तोफा चौक ते ब्ल्यू नाईल चौक ईस्कॉन मंदीरासमोरून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : ब्ल्यू नाईल चौक ते तीन तोफा चौकाकडे जाणारा मार्ग हा दुतर्फा वाहतुक करण्यात येईल

कोंढवा वाहतुक विभाग…

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
१) गगनउन्नती चौक येथील यू टर्न बंद करण्यात येत आहे.
२) केसर लॉज जवळील यू टर्न बंद करण्यात येत आहे.
३) खडीमशिन पोलिस चौकी ते श्रीराम चौक या रोड वरील वाहतूक बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : सदर मार्गावरील वाहनांनी खडी मशिन चौकातून यू टर्न घेऊन इस्कॉन मंदिराच्या पार्किंग कडे जावे व अन्य वाहनांनी इच्छित स्थळी जावे
(मंतरवाडी फाटा खडीमशिन चौक कात्रज चौक दरम्यानचे मार्गावरील जड वाहतुक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.)

वानवडी वाहतुक विभाग…

१) शिवरकर रोड वरील वाहतुक बंद करण्यात येत आहे.
– पर्यायी मार्ग : १) सदर मार्गावरील वाहनांनी संविधान चौकातून डावीकडे वळून सनग्रेस स्कुल मार्गे साळुंखे विहार रोडने इच्छित स्थळी जावे व येणारी वाहतुक त्याच रोडने येईल.
२) संविधान चौकाकडून उजवीकडे जाणारी वाहने ही फ्लॉवर व्हॅली लेनकडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छितस्थळी जातील.
३) साळुंखे विहार रोडने येणारी वाहने संविधान चौकातून डावीकडे न वळता उजवीकडे वळून फ्लॉवर व्हॅली लेन कडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छित स्थळी जातील.

Web Title: There will be strict police security in pune city on the occasion of dahi handi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Dahi Handi 2025
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
4

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.