Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि भविष्याशी निगडित असलेला चासकमान कालव्याच्या अस्थरीकरणाचा मुद्दा अखेर विधानसभेच्या सभागृहात घुमला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 03:58 PM
चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल!
  • आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक
  • कांद्याला हमीभाव देण्याची मागणी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि भविष्याशी निगडित असलेला चासकमान कालव्याच्या अस्थरीकरणाचा मुद्दा अखेर विधानसभेच्या सभागृहात घुमला. खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट जाब विचारला. चासकमान धरण येथून निघणाऱ्या कालव्याच्या ० ते ७२ किलोमीटर अंतरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचा गंभीर आरोप आमदार काळे यांनी सभागृहात मांडला. गेली अनेक वर्षे अस्थरीकरणाचा विषय चर्चेत असला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही.

 

पूर्व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना या गळतीचा मोठा फटका बसत आहे. पाण्याअभावी शेतजमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या. अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने अस्थरीकरण हा उपाय सुचवून टेंडरही काढले; मात्र प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले दिसत नाही.

टेंडर मिळालेल्या कंत्राटदाराने काही ‘गौडबंगाल’ केल्याचा संशय व्यक्त करत आमदार काळे यांनी संबंधित मंत्र्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. ४५० ते ५०० क्यूसेकने वाहणारे पाणी शिरूर भागात पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

३० दिवसांत नियोजित प्रमाणात पोहोचणारे पाणी, ४५ दिवस पाणी सुरू ठेवूनही शिरूरपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसल्याने खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप त्यांनी केला. ० ते ७२ कि.मी. अंतराचे अस्थरीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुढील टप्प्याच्या कामाची तयारी शासनाने सुरू केल्याबाबत आमदार काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“प्रथम गळती थांबवणे अत्यावश्यक असताना पुढील कामाची घाई का?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. जोपर्यंत ० ते ७२ कि.मी. अंतराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुढील कामास परवानगी देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

खेळ करणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये

काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्याला काळ्या यादीत टाकून काम काढून घेण्याचा ठराविक प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडला. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याशी खेळ करणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये, अशी मागणी त्यांनी केली.

कांद्याला हमीभाव मिळावा

चासकमान कालव्याच्या प्रश्नाबरोबरच कांद्याला हमीभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी सौर प्रकल्प राबविण्याबाबतही आमदार काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. “खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही,” असा ठणकावून इशारा देत त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील, असे स्पष्ट केले. राजकीय वर्तुळात या आक्रमक भूमिकेची चर्चा रंगली असून, शासन आता नेमकी कोणती पावले उचलते याकडे खेड-शिरूर परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mla babaji kale became aggressive in the legislative assembly over farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Khed

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
3

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.