Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transporters Strike 2026: राज्यात ५ मार्चपासून ट्रान्सपोर्टरचा चक्का जाम! टोल आणि ई-चलन नियमांविरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार

रस्ते विकासासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेलवर आधीच 'सेस' (Cess) आकारून मोठा निधी गोळा करते, असे असतानाही 'बीओटी' (Build-Operate-Transfer) तत्त्वावर उभारलेल्या रस्त्यांवर पुन्हा भरमसाठ टोल आकारला जातो.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 28, 2026 | 05:22 PM
Maharashtra Transporters Strike 2026, Indefinite Strike from March 5,

Maharashtra Transporters Strike 2026, Indefinite Strike from March 5,

Follow Us
Follow Us:
  • इंधनावर सेस देऊनही पुन्हा ‘बीओटी’ रस्त्यांवर टोलची वसुली
  • २० जानेवारी २०२६ पासूनचा नियम: ५०% दंड भरल्याशिवाय सुनावणी नाही; वाहन ‘ब्लॅकलिस्ट’चा धाक
  • रेट्रोफिटमेंट उपकरणांच्या सक्तीमुळे फिटनेस रोखले जात असल्याचा आरोप
 

Maharashtra Transporters Strike 2026:

Maharashtra Transporters Strike 2026: पुणे: राज्यातील शाळा बस, रिक्षा, टुरिस्ट कॅब आणि मालवाहतूक करणाऱ्या सार्वजनिक सेवा वाहनांवरील अन्यायकारक कर, टोल आणि ई-चलन प्रणालीच्या विरोधात वाहतूक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. येत्या ५ मार्चपासून लोकसहभागातून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, यासाठी **’महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी’**ची स्थापना करण्यात आली आहे.

शनिवारी पुण्यात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या मांडल्या. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहतूकदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. जनतेच्या दैनंदिन गरजांसाठी अत्यावश्यक सेवा देऊनही सरकारकडून केवळ महसूल वसुलीचे साधन म्हणून आमच्याकडे पाहिले जाते, असा आरोप वाहतूक संघटनांनी केला आहे.

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

वाहतूकदारांच्या प्रमुख तक्रारी आणि मागण्या:

रस्ते विकासासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेलवर आधीच ‘सेस’ (Cess) आकारून मोठा निधी गोळा करते, असे असतानाही ‘बीओटी’ (Build-Operate-Transfer) तत्त्वावर उभारलेल्या रस्त्यांवर पुन्हा भरमसाठ टोल आकारला जातो. हा वाहनधारकांवर पडणारा थेट दुहेरी आर्थिक बोजा आहे.अनेक टोल रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असूनही संबंधित ठेकेदारांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही. जनतेकडून पैसे घेऊनही त्यांना खड्डेमुक्त रस्ते मिळत नसल्याबद्दल संघटनांनी संताप व्यक्त केला.

‘नो पार्किंग’ सारख्या नियमांखाली होणारी दंड वसुली ही शिस्त लावण्यासाठी नसून केवळ सरकारी तिजोरी भरण्यासाठी केली जात आहे. वाहतूक पोलिसांना ठराविक दंडाचे ‘टार्गेट’ दिले जात असल्याचा खळबळजनक आरोपही यावेळी करण्यात आला. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याऐवजी केवळ वसुलीवर भर दिला जात असल्याचे संघटनेने म्हटले.

देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

सीमा तपासणी नाक्यांवरील (Check Posts) बेकायदा वसुली:

राज्य सरकारने एप्रिल २०२५ मध्ये सीमा तपासणी नाके बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक नाके अजूनही सुरूच आहेत. या नाक्यांवर वाहन चालकांकडून सर्रास बेकायदा वसुली केली जात असल्याचा दावा ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने केला आहे.

रेट्रोफिटमेंटच्या नावाखाली अतिरिक्त उपकरणे बसविण्याची सक्ती करून फिटनेस प्रमाणपत्र रोखले जाते, ही बाब अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले. ई-चलन नियमांमध्ये २० जानेवारी २०२६ पासून झालेल्या बदलानुसार दंडाच्या ५० टक्के रकमेची आगाऊ भरपाई केल्याशिवाय अर्ज ऐकला जात नाही व वाहन ‘ब्लॅकलिस्ट’ केले जाते, ही तरतूद घटनात्मक हक्कांना बाधक असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

करप्रणालीबाबतही संघटनेने आकडेवारी देत सांगितले की, राज्यात कर्मचारी वाहतूक वाहनांवर प्रति आसन ₹१,९०० व वातानुकूलित वाहनांवर ₹६,५०० वार्षिक कर आकारला जातो, तर काही राज्यांनी करात मोठी कपात केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही करकपात करावी, अशी मागणी करण्यात आली. वाहतूकदारांशी संबंधित दंड, परवाना, जप्ती, कर व ई-चलन प्रकरणांसाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. आंदोलनाबाबत नागरिक, शाळा व कंपन्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

Web Title: Transporters to stage indefinite protest against toll and e challan rules in the state from march 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Public Transport
  • pune news
  • school bus

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.