Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indapur : अजित पवारांच्या घातपाताचा संशय; बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 04:16 PM
Indapur : अजित पवारांच्या घातपाताचा संशय; बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या घातपाताचा संशय
  • बावडातील ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय
  • उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. मात्र, निधनानंतर समोर येत असलेल्या विविध घडामोडींवरून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 

सदर प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी रविवारी (दि. १ मार्च) सकाळी ९ ते ११ या वेळेत बावडा गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या संदर्भातील निवेदन शुक्रवारी (दि. २७) बावडा-नरसिंहपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आले. या निवेदनावर पवनराजे घोगरे-पाटील, अशोक मगर, शितल कांबळे, विक्रांत घोगरे, गणेश कांबळे, किशोर घोगरे, मंगेश घोगरे, अमीर सय्यद, हनुमंत भोसले, निलेश घोगरे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

हे सुद्धा वाचा : कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

बारामती अजूनही शोकसागरात

आज शनिवार २८ फेब्रुवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र या महिनाभरात काळ पुढे सरकला असला तरी बारामतीकरांच्या मनातील दुःख अजूनही ताजे आहे. जणू कुटुंबातीलच एखादा जिवाभावाचा सदस्य अचानक निघून गेला आणि घरभर पसरलेले शांत, उदास वातावरण अजूनही हललेले नाही, अशीच अवस्था संपूर्ण शहराची झाली आहे. अजितदादांनी अनेक वर्षे बारामतीच्या विकासासाठी घेतलेली धडपड, राबवलेली विविध प्रकल्पांची स्वप्ने आणि सर्वसामान्यांशी ठेवलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे ते प्रत्येकाच्या मनात घर करून होते. त्यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूने शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. महिनाभर उलटून गेला तरी बाजारपेठा, चौक, गावोगावी अजूनही त्यांच्या आठवणींचीच चर्चा रंगताना दिसते. गेल्या काही दिवसांत विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलन, सामूहिक प्रार्थना आणि मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. “दादा होते म्हणून आम्हाला आधार होता,” अशी भावना व्यक्त करत अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणले.

Web Title: Villagers of bavda village in indapur taluka have become aggressive due to the death of ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • indapur news

संबंधित बातम्या

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…
2

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…

संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा
3

संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?
4

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.