पुणे: राज्यातील बाल अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. बदलापुरात झालेल्या घटना अद्याप ताजी असतानाच पुण्यात दोन वृद्ध व्यक्तीनी दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नाही तर त्यांनी घरी सांगितल्यास त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात बाल अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 78 वर्षीय वृद्धाने शुक्रवारी (6 सप्टेंबर) 7 वर्षांच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवले आणि तिला घरी नेले. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. मुलीने आरडाओरडा करताच त्याने तिचे तोंड दाबून गळ्याला चाकू लावून घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगी घाबरली होती. पण घरी आल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडला प्रकार सांगितला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मधुकर पिराजी थिटे विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, दुसऱ्या घटनेतही एका घटनेतही एका70 वर्षीय नागरिकाने 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एका 70 वर्षीय नागरिकाने अल्पवयीन मुलीला चॉकलेटसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महावीर श्रीमलजी सिंगवी या संशयित आरोपीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.