Pune News: विजयानगर कॉलनीतील 'ती' जागा ट्रस्टकडे; महापािलकेची ‘ओपन'स्पेस’ परत मिळविण्यासाठी धावाधाव
पुणे: सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी मधील ‘ओपनस्पेस’ ची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीबाई चास्टवे चॅरिटेबल ट्रस्टने ताब्यात घेतली आहे. दरम्यान, महापािलकेने या जागेचा ताबा दिला नाही असा दावा केला आहे. ही जागा परत मिळविण्यासाठी आता महापािलकेच्या विधी विभागाला धावपळ करावी लागणार आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या विजयानगर काॅलनी येथील सुमारे ६ हजार ५४. ३१ चाैरसमीटर एवढी जागा ओपन स्पेस म्हणून दर्शविली गेली आहे.
१९८८ साली महापालिकेने या जागेचा गैरवापर हाेत आहे, या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीप्रमाणे जागा मालकास नाेटीस पाठविली हाेती. तसेच केवळ ्एक रुपयाच्या नाममात्र माेबदल्यात ही जागा महापािलकेने ताब्यात घेतली. त्याविरुद्ध ट्रस्टने कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाद मागितली हाेती. या दाव्याचा १९९९ साली निकाल लागला. सदर निकालानुसार जागेचा ताबा घेण्यापासून महापािलकेला मनाई केली हाेती. सदर जागा ताबा घेताना आवश्यक प्रक्रीया पार पाडली गेली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नाेंदविले हाेते.
या नंतर महापािलकेने २००० साली पुन्हा जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु केली. दरम्यान, ट्रस्टने २०२० साली न्यायालयात दरखास्त दाखल करून २००७ च्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली हाेती. यासंदर्भात महापािलकेला नाेटीस मिळाली नाही असा दावा विधी विभागाकडून केला जात आहे. या दरखास्तीनुसार १९ नाेव्हेंबर राेजी सदर जागेचा ताबा हा न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्टला दिला गेला.
सदर ताब्याच्या कागदपत्रावर महापालिकेच्यावतीने काेणी सह्या केल्या नाहीत. तसेच न्यायालयाकडे महापािलकेच्या विधी विभागाने अर्ज दाखल केले आहे. यामध्ये दरखास्तीवर अंमलबजावणी करण्यापुर्वी न्यायालय काेणत्या गाेष्टींचा विचार करू शकते याची माहीती दिली आहे. त्याचप्रमाणे महापािलकेने ताबा देण्यास विराेध केला आहे, या हरकतीचा विचार करावा असे अर्जात नमूद केले आहे. या निर्णयाविरुद्ध अपिल करण्यासंदर्भात विधी विभागाकडून विचार केला जात आहे.
– निशा चव्हाण, महापािलकेच्या विधी सल्लागार
– ट्रस्टचे म्हणणे काय ?
सदर जागेचा ताबा १९६७ पासून अामच्याकडे
महापािलकेने जाहीर प्रकटन देऊन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया बेकायदेशीर
जागेचा काेणताही गैरवापर हाेत नाही, त्यासंदर्भात काेणताही पुरावा सादर नाही.
हेही वाचा: खासदार, आमदार झाले! आम्ही नगरसेवक कधी होणार? कार्यकर्त्यांना सवाल; अडीच वर्षे प्रशासकीय राज
खासदार, आमदार झाले! आम्ही नगरसेवक कधी होणार?
लाेकसभेपाठाेपाठ आता विधानसभा निवडणुका पार पडल्या असुन, खासदार झाले, आमदारही झाले, पण आम्हाला नगरसेवक म्हणून कधी संधी मिळणार ? अशी चर्चा आता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. अडीच वर्षाहून अधिक कालावधी लाेटूनही महापािलकेत प्रशासकीय राज आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नागरीकांचे प्रश्न साेडविण्यात अडचणी येत आहे. मे महीन्यात झालेल्या निवडणुकीत लाेकसभेत भाजप आणि मित्र पक्षाने बहुमत मिळविले. तर नाव्हेंबर महीन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त कमबॅक केले आहे. जवळपास 200 पेक्षा जास्त जिंकून महायुतीने घवघवीत यश प्राशत केले आहे.तर महाविकास आघाडीला 50 जागांवरच रोखले आहे. मात्र आता या पार्श्वभुमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी हाेणार याची चर्चा सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांना देखील हाच प्रश्न पडला आहे.