Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योगनगरीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी

पवना आणि इंद्रायणी नद्यांलगत असलेल्या पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.आरोग्य पथकेही तयारीत असून काही ठिकाणी त्यांनी निर्जंतुकीकरण सुरुही केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2025 | 02:35 AM
उद्योगनगरीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: उद्योगनगरीतून वाहणाऱ्या पवना,मुळा,इंद्रायणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात दुपारी पवनेचे पाणी शिरले. त्यामुळे तसेच संत तुकाराम महाराजांची आषाढ वारीची पालखी आज शहरात आल्याने महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून पूर परिस्थितीचा तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.संभाव्य स्थितीचा विचार करून योग्य ती तयारी केली असून सुरक्षितता आणि अत्यावश्यक सेवा अखंड ठेवण्यास कटिबद्ध आहे,अशी ग्वाही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

मावळातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे.परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाण्याची टक्केवारी ३५.६३ वर गेली.उन्हाळ्यात ती २४ टक्यापर्यंत खाली आली होती.गेल्या २४ तासात पवना धरण क्षेत्रात ८७ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती या धरणाचे प्रमुख तथा जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी दिली.पवना नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून रमाईनगर झोपडपट्टी,पिंपरीतील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी आज नेण्यात आले. पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकिनारच्या रहिवाशांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेचे आपत्ती निवारण अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी आपला आवाज शी बोलताना केले.

दुसरीकडे संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता,अडथळे दूर करण्याकरिता, पाणी साचण्याच्या ठिकाणी किंवा पूरस्थितीच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आपत्कालीन योजना महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे.सर्व क्षेत्रीय कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरु केला असून पाणी साठणाऱ्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथके तैनात केली
आहेत.ती पंप,बचाव साहित्याने सज्ज आहेत.अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने १५ बोटी,२०० लाईफ जॅकेट्स तयार ठेवली आहेत.

पवना आणि इंद्रायणी नद्यांलगत असलेल्या पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.आरोग्य पथकेही तयारीत असून काही ठिकाणी त्यांनी निर्जंतुकीकरण सुरुही केले आहे.एकूणच प्रशासन सतत हाय अलर्ट मोडवर असल्याचे स्पष्ट करीत नागरिकांनीही देण्यात येणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेऊन सहकार्य करावे व जागरूक राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला

पुणे जिल्हा आणि शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान अजूनही पुण्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा विसर्ग 2000 क्युसेक इतका होता. तर पावसाचा जोर वाढल्याने धरणातून आता 4,345 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Pune Monsoon Update: पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला

धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.

Web Title: Water entered the morya gosavi temple in chinchwad heavy rain maharashtra pune pcmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Rain
  • PCMC News

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
2

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द
3

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.