Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: ‘समान पाणी पुरवठा’ कधी? बेकायदा नळजोडांमुळे पाणीगळती; पाणीपुरवठ्याचे मोजमाप करणे अवघड

बेकायदा नळजोडांमुळे नुकतेच सुरू झालेली पाणी पुरवठा यंत्रणा कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 16, 2025 | 10:20 PM
Pune News: ‘समान पाणी पुरवठा’ कधी? बेकायदा नळजोडांमुळे पाणीगळती; पाणीपुरवठ्याचे मोजमाप करणे अवघड
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: बेकायदा नळजोडांमुळे पाणी पुरवठ्याचे मोजमाप करणे अवघड होते. या नळजोडांमुळे साधारण २० टक्क्यांहून अधिक पाणी गळती होते. पुणे महापालिकेने मागील काही वर्षात बेकायदा नळजोडांना चाप लावण्यासाठी अशा नळजोडांवर कारवाई देखिल केली आहे. बेकायदा नळजोडांमुळे पाणी पुरवठ्याचे नियोजनही कोलमडत असल्याने पाणी उपलब्ध असतानाही अनेकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यासंदर्भात अनेक शहरांना आलेला अनुभव लक्षात घेता नव्याने होणार्‍या देवाची उरूळी फुरसुंगी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये तातडीने ‘समान पाणी पुरवठा’ योजना राबविण्याची गरज असल्याचे मत जाणकार अधिकारी व्यक्त करत आहेत.

देवाची उरूळी आणि फुरसुंंगी ही गावे महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतू अद्यापही प्राथमिक सुविधा देण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडेच आहे. ही गावे वगळल्यानंतर नळजोड मिळावा यासाठी महापालिकेकडे एकही अर्ज आलेला नाही. बेकायदा नळजोडांबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास महापालिका कारवाई करेल.

बेकायदा नळजोडांमुळे नुकतेच सुरू झालेली पाणी पुरवठा यंत्रणा कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला आहे. नगर परिषद स्थापनेची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप या गावांना प्राथमिक सुविधांसाठी महापालिकेवरच अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेच्या कचरा डेपोमुळे जलस्त्रोत प्रदुषित झाल्याने महापालिका या परिसरात अद्यापही दररोज २०० टँकर पाणी पुरवठा करत आहे.

हेही वाचा: Supriya Sule: “… हा निवडणूक जुमला ठरू नये”; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला खोचक टोला

यंत्रणा नसल्याने गैरफायदा

देवाची उरूळी परिसरात काही ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनचे काम करून घेण्यात आले आहे. परंतू देवाची उरूळी व फुरसुंगी परिसरातील अनेक भागात पाईपलाईनचे काम अद्याप व्हायचे आहे. सध्या ही दोन्ही गावे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नाहीत. येथे प्रशासक नेमण्यात आला आहे. येथील कामांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात नसल्याने अनेकांचे फावले आहे. काही ठिकाणी टाकलेल्या पाईपलाईनमधून बेकायदा नळजोड देण्यासाठी १५ ते २५ हजार रुपये आकारले जात आहेत. यामुळे पैसे देउन हवे तेवढे कनेक्शन घेण्यासाठी ठराविक वर्ग सरसावला आहे. रात्रीच्यावेळी बिनधास्त रस्ते खोदाईकरून बेकायदा टॅप मारण्याची कामे सुरू आहेत. बेकायदा टॅपमुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, अशी माहिती येथील सुजाण नागरिकांनी दिली.

हेही वाचा: दादांकडून खूप काही शिकण्यासारखंं; पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक

नळजोड तोडणीबाबतचा ‘एसएमएस’

पिंपरी – चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरात नागरिकांचे आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे देवेश जोशी, महापालिका अधिकारी या नावाने व 9309445824 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनपर फसवणूक करणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. असे ‘एसएमएस’ हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. असे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Water leakage due to illegal pipe connections pune carporation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 10:20 PM

Topics:  

  • Pune
  • Water supply

संबंधित बातम्या

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब
1

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
2

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
3

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
4

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.