खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला टोला (फोटो - सोशल मिडिया)
पुणे: महापािलकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांतील नागरिकांनी सुविधा मिळत नसल्याने कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समाविष्ठ गावांतील कराला स्थगिती देण्यात आली आहे. ही कर स्थगिती निवडणूक जुमला ठरू नये, असा खोचक टोला सरकारला लगावला आहे. समाविष्ठ गावांतील मालमत्ता कर वसुलीला स्थगित असल्यामुळे महापालिकेचा सुमारे 200 कोटी रुपयांचे महसूल बुडत आहे. त्यासंदर्भात पुन्हा कर वसुली केली जाईल, अशी चर्चा सुरु झाली. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी महापािलकाआयुक्त राजेंद्र भाेसले यांच्यासोबत बैठक घेतली. त्यात समाविष्ट गावांतील सध्या कराची स्थिती काय आहे, अशी विचारणा केली. यावेळी विविध विषयावर सुळे यांनी भूमिका मांडली.
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी बाेलताना त्यांनी वालि्मक कराड याच्यावर माेक्का कायद्यानुसार झालेल्या कारवाई बद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले. ‘‘वाल्मिक कराडचे कीती अकाउंट सील केले आहेत. त्यात किती पैसे होते हे समजायला हवे. यात इडी का लागत नाही? अनिल देशमुख आणि इतर नेत्यांवर इडी लागली. मात्र, इथे गुन्हा नोंद असुनही इडी का लागली नाही, ’’असा सवाल यावेळी सुळे यांनी केला आहे.
‘‘ खुनाच्या गुन्ह्यातील अजूनही एक आरोपी का पकडले गेला नाही. आणि चाटे नावाचे जे व्यक्ती आहे त्याचा मोबाईल कुठे आहेत. या प्रकरणात जे कोणी सहभागी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे’’असे यावेळी सुळे म्हणाल्या. बारामती मतदार संघातील काही शेतकऱ्यांनी वाल्मीक कराड यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार केली होती. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की ज्या शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले अश्या शेतकऱ्यांची आज किंवा उद्या मी भेट घेणार आहे. त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने याकडे गांभीर्याने घेतल पाहिजे. तसेच बारामती मतदारसंघातील कोणत्याही शेतकऱ्यावर जर अन्याय झाला असेल तर याबाबतची तक्रार मी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने सहा वार! खासदार सुप्रिया सुळेंनी केली कुटुंबियांची विचारपूस
मुंडेंनी भेट घेतली असेल तर धक्कादायक !
मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची चर्चा आहे. याबाबत सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की धनंजय मुंडे जर वाल्मिक कराडच्या आईंना भेटले असतील तर हे खूपच शॉकींग आहे. त्यांचा अजेंडा काय आहे? त्यांना याचे उत्तर हे द्यावे लागेल. तसेच राजीनामा बाबत राजिनामा हा नैतकीतेवर द्यायचा असतो. अनेक नेत्यांनी नैतिकतेच्या आधावर राजिनामा दिलेला आहे. अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर राजिनामा दिला होता. आत्ता वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा बीड जिल्ह्याचा प्रमुख आहे का हे पाहायला पाहिजे. असे यावेळी सुळे म्हणाल्या.