Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीरा-भाईंदर मनपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह, ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत मुलांच्या आरोग्याशी खेळ, पालकांनी व्यक्त केला संताप

'माझी वसुंधरा' मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत लहान मुलांना प्रचंड उन्हाच्या तडाख्यात उघड्यावर बसवून स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या या हलर्जीपणामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2025 | 03:16 PM
मीरा-भाईंदर मनपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह, ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत मुलांच्या आरोग्याशी खेळ, पालकांनी व्यक्त केला संताप
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर / विजय काते : मीरा-भाईंदर महानगरपालिका आयोजित उपक्रमांमधून पुन्हा एकदा प्रशासनाच्या कामकाजातील हलगर्जीपणा समोर आला आहे. ‘माझी वसुंधरा’ मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत लहान मुलांना प्रचंड उन्हाच्या तडाख्यात उघड्यावर बसवून स्पर्धा घेण्यात आली. उन्हाचा पारा चढलेला असताना बंदिस्त जागेऐवजी उघड्या मैदानात अशा प्रकारची स्पर्धा घेण्यात का आली, असा सवाल स्थानिक रहिवासी करत आहेत.

Rohit Pawar News: रोहित पवारांना होमग्राऊंडवर मोठा धक्का; कर्जत जामखेडमध्ये राजकीय उलथापालथ

त्याचप्रमाणे, ‘किल्ला सायक्लोथॉन’ स्पर्धेदरम्यानही मनपाचे नियोजन फसले. यासंदर्भात स्पर्धेच्या एक दिवस आधी दैनिक नवराष्ट्रमध्ये उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. परिणामी, स्पर्धेदरम्यान एक सायकलस्वार बॅरीगेट तोडून किल्ल्याजवळून खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. अधिक धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी रुग्णवाहिका किंवा स्वयंसेवक उपस्थित नव्हते. त्यामुळे संबंधित स्पर्धकाला स्वतः सायकल चालवत खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले.

या संपूर्ण प्रकारावर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “जर तुम्हाला योग्य नियोजन करता येत नसेल, तर अशा स्पर्धा आयोजितच करू नका,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “ आपल्याला माहिती नसेल तर असे कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थांना एकत्र घेऊन आपण हे कार्यक्रम करायला हवे होते तसेच त्या संस्थांना सहभागी करून नियोजन करणे आवश्यक होते,” असेही ते म्हणाले.

Thackeray-MNS Conflict: मनसे-ठाकरे पुन्हा आमनेसामने; मनसेचं मराठीसाठी आंदोलन, उद्धवसेनेची नवी खेळी

“स्थानिक नागरिक जर तुमच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील तुमचीच आहे. उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या साऱ्या घटनांमुळे मनपाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, करोडो रुपये खर्च करून अशा नियोजनशून्य उपक्रमांत वेळ व संसाधने वाया घालवू नयेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशीही जोरदार मागणी होत आहे.

Web Title: Question mark over mira bhayander municipal corporations planning chaos in majhi vasundhara competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
1

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
2

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा
3

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप
4

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.