मुंबई : दिल्लीत केंद्र सरकारचे हिवाळी संसदीय अधिवेशन सुरु आहे, तर नागपुरात शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दोन्ही अधिवेशनात सामान्यांचे प्रश्न मांडले जात असतात, सर्वसामान्यांच्या, मजुरांच्या, तरुणांच्या, महिलांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समस्येवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांची उणीधुणी काढत चिखलफेक करत आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात लोकसभेत खासदार राहुल शेवाळेंनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. व त्यांनी एयू…असा थेट आरोप आदित्य ठाकरेवर केला आहे. त्यानंतर याचे पडसाद राज्यातील अधिवेशनात उमटताना दिसत असून, यावर गृहमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
[read_also content=”आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ‘ठाकरे सेना’ आज नागपुरात येणार? सर्व आरोपावर उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर तोफ डागणार, सर्वाचे लक्ष… https://www.navarashtra.com/maharashtra/thackeray-sena-will-come-to-nagpur-today-in-support-of-aditya-thackeray-uddhav-thackeray-will-fire-on-opposition-356722.html”]
दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर खासदार राहुल शेवाळे चांगलेच चर्चेत आले आहेत. शेवाळेंच्या आरोपानंतर त्यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच यावरुन विधानपरिषदेत सभापती निलम गोर्हे यांनी एसआयटी चौकशीचे निर्देश दिल्यानंतर आता प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषद घेत कोरोनाकाळात मी ज्या महिलेला मदत केली ती महिला मला ब्लॅकमेलिंग करत असून, खोटे फोटो व व्हीडिओ व्हायरल करत आहे व माझी बदनामी करत आहे तसेच ह्या महिलेचा थेट संबंध कुख्यात गुंड दाऊत इब्राहिम याच्याशी असल्याचा दावा खासदार राहुल शेवाळेंनी केला आहे.
पुढे बोलताना शेवाळे म्हणाले की, या महिलेला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला नेत्याचा देखील महिलेला पाठिंबा आहे. या महिलेशी आपला काही संबंध नसून मित्राच्या सांगण्यावरून आपण तिला कोरोनाकाळात मदत केली होती. या महिलेला दुबईत शिक्षा सुद्धा झाली आहे. ही महिला पैसे उकळण्यासाठी मला ब्लॅकमेलिंग करत आहे असं शेवाळेंनी म्हटलं आहे. पण या महिलेचा थेट संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडल्यामुळं सर्वाचाच भुवया उंचावल्या आहेत.