Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद कामगिरी! रायगड किल्ला रात्रीही विजेमुळे होणार प्रकाशमान : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात असताना ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेली माहिती म्हणजे शिवजयंतीनिमित्त राज्याला एक अनोखी भेट मानली जात आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 21, 2022 | 09:14 PM
अभिमानास्पद कामगिरी! रायगड किल्ला रात्रीही विजेमुळे होणार प्रकाशमान : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवछत्रपतींची (ShivChatrapati) राजधानी (Capital) असलेल्या रायगड किल्ल्यावरील (Raigad Fort) जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या (Power Lines) बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचे अतिशय अवघड कार्य महावितरणच्या (MSEDCL) माध्यमातून राज्य सरकारने पार पाडले असून यामुळे रायगड किल्ला रात्रीही प्रकाशमान होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

“रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रु. ६.०४ कोटीचा निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामाचा कार्यादेश दिनांक ५ मार्च २०२० रोजी देण्यात आला होता.

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी हे अतिशय आव्हानात्मक व कठीण काम शिवकार्य म्हणून एकजुटीने व आत्मीयतेने पूर्णत्वास नेले,” याबद्दल या सर्वांचे ऊर्जामंत्री राऊत यांनी अभिनंदन केले आहे.
रायगड किल्ल्यातील हे काम प्राधान्याने आणि उत्कृष्टपणे पार पडावे म्हणून स्वतः ऊर्जामंत्री या कामावर लक्ष ठेवून होते.

रायगड किल्याला सद्यस्थितीत २२ केव्ही कलोशे उपकेंद्रामार्फत, २२ केव्ही पाचाड वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. रायगड किल्ला कलोशे उपकेंद्रापासून १५ किमी आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे २८५० फूट इतकी आहे. वीज कर्मचारी व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करुन आवश्यक भूमिगत केबल (वजन अंदाजे ५१५ किलो) व ४ वितरण रोहित्र (वजन अंदाजे ७३४ किलो प्रत्येकी) हाताने ओढत व खांदयावर भार घेऊन सदर साहित्य गडावर पोचवण्यात आले याबद्दल डॉ. राऊत यांनी महावितरणचे अधिकारी कर्मचारी व हे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे कार्यरत संबंधितांचे मंत्री डॉ.राऊत यांनी कौतुक केले.

सदर योजनेमध्ये गडावर नविन ४ वितरण रोहित्रे, २ कि.मी. उच्चदाब वाहिनी, ३.०५ कि.मी. लघुदाब तारमार्ग वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर व २.५ कि.मी. लघुदाब वाहिनी इत्यादी कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे मार्च २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

रायगडावर सुरक्षित आडोशाच्या ठिकाणी ४ वितरण रोहित्रे बसविण्यात आली असून भूमिगत वीज वाहिन्यांमार्फत वीज वितरण करण्यात येत असल्याने याचा रायगडाच्या सौदर्यांवर कोणतीही परिणाम होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. कोकणातील व प्रामुख्याने गडावर कोसळणारा मुसळधार पाऊस व वारे यामुळे सुरक्षितता व टिकाऊपणाच्या दृष्टीने विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत.

डॉ. आंबेडकरांनीही दिली होती भेट

“महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आटोपल्यावर सन १९२७ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड किल्ल्यास ऐतिहासिक भेट दिली. रस्ता नव्हता म्हणून नाते ते पार्थर्डी पर्यंत बाबासाहेब पायी चालत गेले. बॅरिस्टर झालेली ते पहिलीच व्यक्ती जिने पायी रायगड गाठला. यावेळी उपस्थित सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो,अशा घोषणा देत होते,” अशी आठवणही त्यांनी सभागृहात सांगितली.

Web Title: Raigad fort will be illuminated even at night due to electricity energy minister dr nitin raut nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2022 | 09:12 PM

Topics:  

  • Dr. Nitin Raut
  • Raigad Fort

संबंधित बातम्या

Raigad : रायगड रिकामा करा! 7 पिढ्यांपासून राहणाऱ्या नागरिकांना पुरातत्व खात्याकडून गड सोडण्याच्या नोटीसा
1

Raigad : रायगड रिकामा करा! 7 पिढ्यांपासून राहणाऱ्या नागरिकांना पुरातत्व खात्याकडून गड सोडण्याच्या नोटीसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.